लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी : तालुक्यातील टाकळी येथे ईश्वर रूद्राप्पा कोरे (वय ४६, रा. वखारभाग मिरज) या बोगस डॉक्टरला जिल्हा परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्यापथकाने अटक केली. टाकळीत ईश्वर कोरे हा वैद्यकीय पात्रता नसतानाहीअॅलोपॅथी औषधोपचार करीत असल्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषद वैद्यकीयअधिकारी डॉ. रागिणी पवार, अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक एस. पी. सावंत,पोलिस हवालदार दत्तात्रय खोत यांच्या पथकाने टाकळीत कोरे याच्यारुग्णालयावर छापा टाकला. यावेळी कोरे याच्याकडून रूग्णांवर उपचारासाठीवापरण्यात येत असलेली अॅलोपॅथी औषधे, रुग्णालयाचा फलक असे साहित्य जप्तकरण्यात आले. यापूर्वीही पथकाने कोरे याच्याविरूध्द कारवाई केली होती.मात्र कोरे पुन्हा वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे आढळल्यानेत्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
टाकळीत बोगस डॉक्टरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 21:01 IST