शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्तीपत्रे

By admin | Updated: August 27, 2014 23:19 IST

मिरजेत मुकादमाकडून फसवणूक : गंभीर प्रकाराकडे आयुक्तांचे दुर्लक्ष

मिरज : मिरजेतील मानधनावरील सफाई कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्तीपत्रे देऊन कामावर घेण्याच्या प्रकाराबाबत तक्रार झाली आहे. मात्र आयुक्त व कामगार अधिकाऱ्यांनी याबाबत मौन पाळल्याने पोलिसांत अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. मिरजेत प्रभाग तीन व चारमध्ये सुमारे चारशे सफाई कामगार आहेत. सफाई कर्मचाऱ्यांवर दरमहा लाखो रूपये खर्च होत असताना, या विभागातील अंदाधुंद कारभारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे. कंत्राटी बदली व मानधनावरील कर्मचाऱ्यांची बोगस हजेरी लावून व वाहनांच्या डिझेलचा अवाजवी खर्च दाखवून दररोज हजारो रूपयांचा घोटाळा करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रभाग चारमध्ये सुमारे दहा कर्मचाऱ्यांना मानधनावर सफाई कर्मचारी म्हणून नियुक्तीचे पत्र देण्यात आले. कामगार अधिकाऱ्याची सही असलेल्या या बोगस पत्राद्वारे नियुक्तीसाठी कामगारांकडून प्रत्येकी २५ हजार रूपये एका मुकादमाने घेतल्याची चर्चा आहे. बनावट आदेशाद्वारे नियुक्ती झालेल्यांपैकी काही कर्मचाऱ्यांचा पगार निघाला नसल्याने, हे प्रकरण चव्हाट्यावर आले. मात्र आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बनावट नियुक्तीपत्रे देणाऱ्या मुकादमाचे निलंबन करून या प्रकरणाच्या चौकशीचा फार्स करण्यात येत आहे. मात्र हजारोेची फसवणूक झालेल्या कामगारांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. बोगस नियुक्तीपत्र देऊन मानधनावरील कर्मचारी भरतीचा प्रकार गंभीर असतानाही कामगार अधिकारी व आयुक्तांनी याची दखल घेतलेली नाही. या घटनेबाबत महापालिका प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार देण्याऐवजी चौकशीचा घोळ घालण्यात येत असल्याची कामगारांची तक्रार आहे. फसवणूक झालेल्या कामगारांनी याबाबत पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. मात्र महापालिकेडून तक्रार नसल्याने पोलिसांनी याची दखल घेतलेली नाही. या भ्रष्टाचाराला अभय देण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणून हे प्रकरण गुंडाळण्याच्या हालचाली सुरू असल्याने कामगार संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)आर्थिक व्यवहाराची चर्चामहापालिकेतील आरोग्य विभागातील खाबूगिरीने कळस गाठला आहे. लाचखोरीच्या प्रकरणात सापडलेले आरोग्य अधिकारी पुन्हा पदावर रूजू झाले आहेत. मिरजेत सफाई कर्मचाऱ्यांना मुकादम म्हणून अनधिकृत व तात्पुरती बढती देण्यासाठीही आर्थिक व्यवहार सुरू असल्याची चर्चा आहे. कामगारांना तात्पुरते मुकादमाचे काम देण्यासाठी स्वच्छता निरीक्षकाची चांदी होत आहे. कचऱ्यातून भंगार विक्रीचा उद्योग जोमात सुरू आहे.