शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीवाडीच्या महिलेचा कृष्णा नदीत मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:25 IST

सांगली : शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या सांगलीवाडीतील महिलेचा मृतदेह सांगलीत कृष्णा नदीवरील बंधाऱ्याजवळ शनिवारी आढळून आला. भारती बोडके असे तिचे ...

सांगली : शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या सांगलीवाडीतील महिलेचा मृतदेह सांगलीत कृष्णा नदीवरील बंधाऱ्याजवळ शनिवारी आढळून आला. भारती बोडके असे तिचे नाव असून या महिलेची आत्महत्या की घातपात याबाबत पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी कृष्णा नदीमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

कृष्णा नदीवर सांगलीवाडीला जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याजवळ नियमितपणे अनेकजण येत असतात. शनिवारी सकाळी काही तरुण पोहण्यासाठी गेल्यानंतर त्यांना एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने शहर पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्पेशल रेस्क्यू फोर्स टीमच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलिसांनी केलेल्या तपासात भारती बोडके ही शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा हा मृतदेह असल्याचे तपासात स्पष्ट झाले. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, बोडके यांनी आत्महत्या केली की घातपात याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद आहे.

चौकट

सलग दुसऱ्या दिवशी दुसरा मृतदेह

शुक्रवारी सकाळीही खणभाग परिसरातील एका महिलेचा मृतदेह कृष्णा नदीत आढळून आला होता. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही सांगलीवाडीतील महिलेचा नदीत मृतदेह आढळून आला आहे.