वाळवा : वाळवा येथे ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानाअंतर्गत मंगळवार, १३ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सर्वपक्षीय कृती समिती व अभिनव ग्रुपच्या सहकार्याने, जिल्हा मध्यवर्ती बँकेंचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर होत आहे.
सर्वपक्षीय कृती समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष धनाजी शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अक्षय फाटक, भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विक्रम शिंदे, मनसे तालुका विभागीय अध्यक्ष सचिन कदम, अभिनव ग्रुप राजीव गावडे यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रक्तदान शिबिर जिल्हा परिषद शाळा नंबर २, हुतात्मा चौक, वाळवा येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.