ओळ : येळावी (ता. तासगाव) येथे शुभम् पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : येळावी (ता. तासगाव) येथे सामाजिक कार्यकर्ते शुभम पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण आणि सॅनिटायझर व मास्कचे वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत निरंकारी मंडळाचे खानापूर संयाेजक दत्तात्रय जगताप महाराज होते.
यानिमित्ताने आयाेजित रक्तदान शिबिरात ५७ दात्यांनी रक्तदान केले. नागरिकांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. परिसरात वृक्षारोपण करून गोविंद वृद्ध सेवा आश्रम येथे जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले. शुभम पाटील यांचे बंधू सागर पाटील यांनी वृद्धाश्रमास संपूर्ण फरशी घालून दिली.