कवठे एकंद : सामाजिक कार्याचा वारसा जपणारे कवठेएकंद (ता. तासगाव) येथील ए-वन युवा मंचाने गणेशोत्सवा निमित्ताने वृक्षारोपण, विद्यार्थी दत्तक योजना, रक्तदान शिबिर अशा सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मनोज नागजे यांनी दिली.
गणेशोत्सव निमित्ताने जुनी चावडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. एमएसआय ब्लड बँक मिरज यांच्या सहकार्याने आणि गावातील युवक मंडळ मित्र मंडळाच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये सुमारे ३० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची शाळा येथे गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थी योजनेसाठी यशवंत मेडिकलचे अमोल भंडारे, एमएसआय ब्लड बँकेचे प्रा. सगरे यांनी विशेष सहकार्य केले.
सामाजिक उपक्रमासाठी मंडळाचे चंद्रकांत नागजे, प्रणीत कांबळे, सोनू माळी, कार्याध्यक्ष सुनील माळी, बबलू गुरव, चेतन माळी, अक्षय मोरे, सुधीर माळी, प्रदीप गुरव, हरीशकुमार गुरव, धनंजय पाटील, शरद नागजे, रमेश नागजे, विजय नागजे, महेश नागजे आदींचे सहकार्य लाभत आहे.