लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा :
राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर झाले. शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आष्टा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश रूकडे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी वैभव शिंदे, पंचायत समितीच्या माजी उपसभापती भाग्यश्री शिंदे, वरदराज शिंदे, नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, प्राचार्य विशाल शिंदे, एन. डी. कुलकर्णी, डॉ. प्रवीण कोळी, डॉ. प्रकाश आडमुठे, संग्राम कुंभार, सतीश माळी, विश्वराज शिंदे, अमोल खंचनाळे, अतुल खंचनाळे, डॉ. सतीश बापट, वीर कुदळे आणि अमोल पडळकर उपस्थित होते.
वैभवदादा शिंदे युवा मंचचे दीपक थोटे, संकेत पाटील, सागर जगताप, राजेंद्र शिंदे, शिरीष पवार, दत्तराज हिप्परकर, महावीर वाडकर, विजय कटारे, कांचन हिरुगडे, इंद्रजीत हिरुगडे यांनी संयोजन केले.