भिलवडी : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रा. राम (भाऊ) उगळे मित्रमंडळ व युवाशक्ती आमणापूर, विठ्ठलवाडी यांच्यातर्फे आयाेजित रक्तदान शिबिरात २६२ दात्यांनी रक्तदान केले. हा दिवस राज्य व केंद्र सरकारने ‘रक्तदान दिवस’ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
‘रक्तदानातून जागवूया बलिदानाच्या स्मृती' या तालुका कॉंग्रेस सरचिटणीस वैभव उगळे, विठ्ठलवाडीचे सरपंच शरद उगळे यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत २६२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, भिलवडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील, रामानंदनगरचे उपसरपंच अभिजित उगळे, धर्मवीर गायकवाड, वैभव पुदाले, आकाश सूर्यवंशी, पृथ्वीराज पाटील, नगरसेवक कपिल गायकवाड, लक्ष्मण थोरात यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली. यावेळी उपसरपंच अशोक काटे, मोहन घाडगे, अशोक अनुगडे, राजाराम राडे, वैभव राडे, रूपेश औटे, सूरज मुळीक, अमित गोरड, अभिजित लोहार, सुशांत राडे, अभिजित तातुगडे, अमोल वाळवेकर, रणजित भोसले, आदींसह युवक उपस्थित होते. या शिबिरास शाश्वत ब्लड सेंटर, भारती ब्लड बँक, मिरज सर्जिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.
फोटाे : ११ भिलवडी १
ओळ : आमणापूर (ता. पलूस) येथील रक्तदान शिबिरास डॉ. विश्वजित कदम यांनी भेट दिली.