शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

जिल्ह्यात ७३ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी

By admin | Updated: April 24, 2017 23:45 IST

वाहनधारकांची धरपकड : पावणेचार लाखांचा दंड वसूल; बेशिस्त वाहनांवर कारवाई

सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यात सोमवारी पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार ६८५ वाहनधारकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून तीन लाख ७० हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही नाकाबंदी मोहीम राबविली होती. परंतु सोमवारी ही मोहीम आणखी तीव्र राबविण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी परिक्षेत्रात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणी व महामार्गावर तसेच ग्रामीण भागातील मार्गावरील विविध चौक, पूल, बायपास रस्ते, महत्त्वाची जंक्शन या ठिकाणी सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेत नाकाबंदी करण्यात आली होती. गेल्या आठवड्यापासून ही मोहीम सुरु आहे. सांगलीसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यात नाकाबंदी सुरू होती. मंगळवारीही नाकाबंदी केली जाणार आहे. आठवड्यातून दोनवेळा अशाप्रकारची कारवाई सुरू ठेवली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)पाचशेहून अधिक पोलिस तैनातजिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्यासह पोलिस फौजफाटा सोमवारी रस्त्यावर उतरला होता. ६ उपअधीक्षक, ४ पोलिस निरीक्षक, १९ सहाय्यक पोलिस निरीक्षक, २५ उपनिरीक्षक, ४६० पोलिस शिपाई नाकाबंदीच्या कारवाईत सहभागी झाले होते. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांची यंत्राद्वारे तपासणी करून कारवाई करण्यात आली. सोमवारच्या नाकाबंदीसाठी पॉर्इंटची संख्या वाढविण्यात आली होती. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ७३ पॉर्इंटवर नाकाबंदी सुरू होती.