सोमनाथ डवरी ल्ल कसबे डिग्रजआगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. मिरज पश्चिम भागासह संपूर्ण जिल्ह्यातच राष्ट्रवादीविरोधी आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील कार्यक्रमात याबाबत रणशिंग फुंकण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नूतन आमदार मोहनराव कदम, स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, श्रीमती जयश्रीताई पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार यांनी याबाबत ग्वाही दिली आहे.इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी आ. जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीयांनी आघाडी केली होती. त्यास जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे मत सर्वच नेत्यांनी व्यक्त करून, आगामी निवडणुकांसाठी त्याच पध्दतीने आघाडी होणार आहे. मिरज पश्चिम भागातील काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत. त्यांना माजी आ. संभाजी पवार यांना मानणारा गटही पाठिंबा देत आहे. परिसरात भाजपचे अस्तित्व तुरळक आहे. पण त्यांनाही सोबत घेण्यात येणार आहे. मिरज, वाळवा, शिराळा या तीनही तालुक्यात राष्ट्रवादीविरोधी आघाडी होण्यात कोणतीही अडचण नसल्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांनी, कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे नेतृत्वाने निर्णय घ्यायचा असतो. या परिसरातील विविधपक्षीय कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीविरोधी आघाडीचे मत वारंवार व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांबाबत सकारात्मक चर्चा होईल. जागा वाटपाबाबत लवचिक धोरण राबवून कवठेपिरान, कसबे डिग्र्रज आणि समडोळी या मतदार संघांबाबत अडचण होणार नसल्याचे सांगितले. शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार म्हणाले, धनशक्तीचा पाडाव करण्यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. सर्वांचा शत्रू एकच आहे. सर्वाेदय साखर कारखाना निवडणुकीसाठीही सर्वांनी मदत करण्याची त्यांनी मागणी केली. विधानपरिषद निवडणुकीपासूनच आम्ही सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वाेदय कारखाना बेकायदेशीरपणे हडपण्याचा डाव आहे. आता जनशक्तीद्वारे सर्वाेदय ताब्यात घेणार आहे, साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.एकंदरीत हा कार्यक्रम जरी विकास कामांच्या उद्घाटनाचा असला तरी, आ. जयंत पाटील यांचे सारे विरोधक एकत्र आले होते. त्याच कार्यक्रमात इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही दमदार मत व्यक्त केले. मदनभाऊ गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी सर्वांचा निर्णय मान्य असल्याचे संगितले. त्यामुळे कसबे डिग्रज जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादीविरोधी आघाडीची चर्चा सुरू असताना, आता ही आघाडी मिरज, वाळवा, शिराळा तालुक्यांबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात करावी, अशी चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली आहे. शिक्कामोर्तब : आघाडीबाबत होणारकसबे डिग्रज, समडोळी, दुधगावबरोबरच आता मौजे डिग्रजमध्येही राष्ट्रवादीविरोधी आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब ‘लोकमत’ने मिरज पश्चिम भागात राष्ट्रवादीविरोधी आघाडी होणार, ही रास्त बातमी दिल्याची कार्यक्रमस्थळी चर्चाकाँग्रेसचा विशाल पाटील गट बाजार समिती निवडणुकीपासून काम करणार का, याकडे लक्ष. सोबत घेण्याची चर्चासर्वोदय साखर कारखाना निवडणूक मिरज पश्चिम भागात जयंतराव पाटील विरोधाने गाजण्याची चिन्हे
राष्ट्रवादीविरोधी रणशिंग फुंकले
By admin | Updated: December 22, 2016 23:32 IST