शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

इनाम धामणीत केमिकलचा स्फोट

By admin | Updated: October 24, 2015 00:20 IST

अनेकजण बेशुद्ध : पोलिसासह सहाजण जखमी; कुटुंबास सुरक्षित बाहेर काढले

सांगली : इनाम धामणी (ता. मिरज) येथील राजेंद्र वाघमारे यांच्या लॅमिनेटेड दरवाजा तयार करण्याच्या कारखान्यात केमिकलचा भीषण स्फोट झाला. यामध्ये एका पोलीस हवालदारासह सहाजण जखमी झाले, तर अनेकजण बेशुद्ध पडले. वाघमारे यांचे कुटुंब या स्फोटात अडकले होते; पण त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली.जखमींमध्ये पोलीस हवालदार शिवाजी भीमराव पवार (वय ५४, रा. विश्रामबाग), सुनील विलास पाटील (२२) व महावीर कुमगोंडा पाटील (४९, दोघे रा. इनाम धामणी) यांचा समावेश आहे. पवार यांच्यावर सांगलीच्या शासकीय, तर पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांना चेहऱ्यावर व हाताला भाजले आहे. अन्य तिघे किरकोळ जखमी असून, त्यांच्यावर गावात उपचार करण्यात आले. स्फोटातील आगीच्या ज्वाला २० ते २५ फूट येत होत्या. तसेच दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात पसरली होती. दुर्गंधीमुळे अनेकजण बेशुद्ध पडले आहेत. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. राजेंद्र वाघमारे यांचे दुमजली घर आहे. पहिल्या मजल्यावर त्यांचा लॅमिनेशनचे दरवाजे तयार करण्याचा कारखाना आहे, तर दुसऱ्या मजल्यावर ते कुटुंबासह राहतात. दरवाजा तयार करण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सुटी झाल्याने कामगार कारखाना बंद करून घरी गेले होते. दरम्यान, सात वाजता कारखान्यातून स्फोटासारखे आवाज येऊ लागले. त्यामुळे परिसरातील लोकांनी गर्दी केली. कारखान्यापासून २० ते २५ फूट अंतरावर थांबलेल्या लोकांवर स्फोटाच्या आगीच्या ज्वाला आल्या. त्यामुळे सहाजण जखमी झाले. हवालदार पवार गर्दी हटविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या चेहऱ्यावर व हातावर आगीच्या ज्वाला आल्या. आगीची तीव्रता वाढू लागल्यानंतर लोक तेथून पळून गेले. परिसरातील लोक आतून दरवाजा बंद करून घरात बसले होते. राजेंद्र वाघमारे यांच्या कुटुंबातील लोक दुसऱ्या मजल्यावर अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढणे मुश्कील बनले होते. वाघमारेंच्या घराशेजारी बांधकाम सुरू आहे. या बांधकामावरून वाघमारे यांच्या घरावर शिडी लावून त्याआधारे कुटुंबातील लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. (प्रतिनिधी) ‘रेजिन’चा स्फोट : गायकवाड\पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड म्हणाले की, राजेंद्र वाघमारे यांचा हिंदविजय कॉलनीत लॅमिनेशनचा दरवाजा तयार करण्याचा कारखाना आहे. दरवाजा तयार करण्यासाठी कोबाल्ट व हार्डनर हे रसायन वापरले जाते. त्यास रेजिन असे म्हटले जाते. हा पदार्थ ज्वलनशील आहे. सहा जखमींमधील अग्निशमन दलाचे कर्मचारी मुकुंद कृष्णा घोरपडे व ग्रामस्थ सुनील विलास परीट, प्रमोद भूगोंडा पाटील किरकोळ जखमी झाले आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या लागल्या. यामध्ये नुकसान किती झाले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.केमिकलचा साठाजखमींच्या नातेवाइकांनी सांगितले की, वाघमारे यांच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा होता. भरवस्तीत ते केमिकलचा साठा करून व्यवसाय करीत आहेत. हे केमिकल ३० ते ३५ लिटरच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये भरलेले असते. स्फोटावेळी याठिकाणी ५० ते ६० कॅन असावेत.