शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’साठी काळी गुढी

By admin | Updated: April 9, 2016 00:06 IST

शासनाचा निषेध : शेकापचे तहसीलसमोर आंदोलन

 कडेगाव : उसाच्या एफआरपीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शासनाचा निषेध करून कडेगाव तहसील कार्यालयासमोर काळी गुढी उभारण्यात आली. यावेळी शेकापचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष पाटील व कार्यकर्त्यांनी शासनाविरुद्ध तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे एकरकमी ऊस बिलाची रक्कम दिलेली नाही. ८० टक्के पहिला हप्ता दिला आहे आणि अद्याप उर्वरित २० टक्के हप्ता देण्यात आलेला नाही. शासनच केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत उदासीन आहे. याशिवाय कडेगाव तालुक्यातील ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असणारी १७ गावे अद्याप टंचाईग्रस्त गावांच्या यादीत समाविष्ट केलेली नाहीत. साखरेचे दर उतरले म्हणून एफआरपी देण्यास टाळाटाळ करणारे कारखानदार आता साखरेचे दर वाढल्यावर तरी कुठे आनंदाने एफआरपी देत आहेत? २० टक्के उर्वरित ऊस बिल तातडीने मिळाले पाहिजे, याशिवाय कडेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्तांच्या यादीत समाविष्ट नसलेली १७ गावे तात्काळ समाविष्ट करावीत, अन्यथा शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेकापने निवेदनातून दिला आहे. याबाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार भिसे यांना देण्यात आले. या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यासाठी संपूर्ण राज्यभर संघटना उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी वक्त्यांकडून देण्यात आला. यावेळी अ‍ॅड. सुभाष पाटील, अ‍ॅड. नानासाहेब पाटील, इंद्रजित पाटील, सागर पाटील, परशुराम माळी, जोतिराम मोरे, विक्रम मोरे, सरपंच संजय मोरे, जयराम मोरे, गोरख महाडिक, नारायण वाघमोडे, श्रीरंग यादव यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदींसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)