शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससमोर भाजपचे कडवे आव्हान

By admin | Updated: February 1, 2017 23:22 IST

दुधोंडी जि. प. गट : उमेदवार निवडीबाबत पक्षांकडून गोपनीयता; आरक्षणामुळे शांतता

सुनील तुपे, राकेश तिरमारे ल्ल किर्लोस्करवाडी, दुधोंडीराजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या दुधोंडी (ता. पलूस) जिल्हा परिषद गटास दुधोंडी व रामानंदनगर गणात उमेदवार निवडीबाबत पक्षांनी गुप्तता पाळली आहे. जिल्हा परिषद गटासाठी आरक्षणामुळे शांतता आहे. मात्र रामानंदनगर गणात चुरस वाढली आहे. दुधोंडी गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. भाजपकडे दह्यारीचे श्रीरंग ऊर्फ राजाभाऊ पाटील यांच्या पत्नी सौ. अश्विनी पाटील यांच्यारूपाने सक्षम उमेदवार मिळाला आहे, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादीकडून मात्र उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे. मागील निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीत अटीतटीची लढत झाली होती. कॉँग्रेसचे हेमंत पाटील जिल्हा परिषद गटातून व मानसिंग बॅँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव यांच्या पत्नी सौ. निर्मलाताई पाटील दुधोंडी गणातून, तर यास्मिन पिरजादे रामानंदनगर गणातून विजयी झाल्या होत्या. तेव्हा कॉँग्रेससमोर राष्ट्रवादीचे कडवे आव्हान होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी एकत्रित लढत दिली होती. तरीही कॉँग्रेसने बाजी मारली होती. यावेळी मात्र कॉँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत किंवा भाजप-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर अरुण लाड राष्ट्रवादीबरोबरच राहिले आहेत. मात्र माजी आमदार संपतराव देशमुख व जी. डी. (बापू) लाड यांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वज्ञात आहेत. त्यामुळे कडेगाव-पलूस तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता जास्त आहे. या दोन पक्षातील दरीचा फायदा कॉँग्रेसला मिळणार आहे, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे साटेलोटे करून हे दोन्ही पक्ष एकत्रित लढतील, अशी चर्चा आहे. पलूस-कडेगाव मतदार संघात कॉँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांचे वर्चस्व असले तरीही कॉँग्रेसला कोणतीही निवडणूक सहजासहजी जिंकता आलेली नाही. त्यांना विजयासाठी संघर्ष करावाच लागला आहे. या निवडणुकीत कॉँग्रेससमोर भाजपचे कडवे आव्हान आहे. घटक पक्ष असलेले आरपीआय, शेतकरी संघटना, शिवसेना आदींना सामावून घेऊन भाजप त्यांची नाराजी कशी दूर करणार, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. दुधोंडी गटात कॉँग्रेसचे नेते मानसिंग बॅँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव यांचे कार्यकर्ते अधिक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडीवेळी कोणत्या गावाला उमेदवार द्यायचा, हे आधी निश्चित केले जाणार आहे. दुधोंडी ग्रामपंचायतीत शिवाजीराव मगर-पाटील, विजय आरबुने व शिवभवानी उद्योग समूहाचे संस्थापक शिवाजीराजे जाधव यांनी एकत्रित लढून सत्ता मिळविली होती. यावेळी मात्र ते एकत्रित लढतील, हे शक्य नाही. त्यामुळे जाधव व आरबुने यांच्याकडे कॉँग्रेस चाचपणी करेल. दुधोंडी हे सर्वांत मोठे व निर्णायक गाव आहे. त्यामुळे या गावाकडे नेत्यांचा कल जास्त असेल. या मतदारसंघात दुधोंडी, दह्यारी, तुपारी, पुणदी, पुणदीवाडी, नागराळे, रामानंदनगर, सावंतपूर या गावांचा समावेश आहे. पूर्वीचे बुर्ली गाव वगळण्यात आले आहे व सावंतपूर या गावाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. बुर्ली हे मोठ्या मताधिक्याचे गाव वगळल्याने कॉँग्रेसच्या मताधिक्यावर जास्त परिणाम होईल, असे बोलले जात आहे. कॉँग्रेसचे नेते आ. डॉ. पतंगराव कदम, आ. मोहनराव कदम, विश्वजित कदम, महेंद्र लाड, जे. के. (बापू) जाधव, शिवाजीराजे जाधव, हेमंत पाटील, संजय पाटील आदी नेते उमेदवार निश्चितीसाठी प्रयत्नशील आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ. पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, शिवाजीराव मगर-पाटील, राजाभाऊ पाटील, संदीप पाटील (घोगाव), मिलिंद पाटील, गुंडा पाटील आदी नेते, तर राष्ट्रवादीतर्फे ‘क्रांती’चे अध्यक्ष अरुण लाड, शरद लाड, किरण लाड, विनायक महाडिक आदी नेते उमेदवारी निश्चितीसाठी प्रयत्नशील आहेत.