शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची पदवीधरमधील मक्तेदारी मोडीत काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST

ते म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत आपण मतदारांना फारकाळ फसवू शकत नाही, हा संदेशही या निवडणुकीत भाजपला मतदारांनी दिला आहे. बोगस ...

ते म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत आपण मतदारांना फारकाळ फसवू शकत नाही, हा संदेशही या निवडणुकीत भाजपला मतदारांनी दिला आहे. बोगस घोषणांनाही जनता कंटाळल्याचे राज्यातील सर्वच जागांच्या निवडणुकीतून स्पष्ट दिसत आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मक्तेदारी असल्याच्या अविर्भावात भाजपचे नेते होते. त्यांना मतदार आणि महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्त्यांनी एकजुटीने जागा दाखविली. कुणी काहीही म्हणोत, महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाव आणि वाड्या-वस्त्यांपर्यंत जाऊन मतदान करून घेतले. प्रत्येकाने विजय खेचून आणायचाच, या जिद्दीने काम केले. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावपातळीवरील कार्यकर्त्यालाही कामाला लावले. प्रचारात आणि मतदान नोंदणीपासून ते करून घेण्यापर्यंत चांगले नियोजन केले होते. म्हणूनच पहिल्या फेरीमध्येच मताधिक्य घेऊन विजय मिळवून प्रस्थापित भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का देण्याचे काम केले आहे. यापुढील प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे हे नियोजन असणार आहे. प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन अटळ असेल, असा विश्वासही अरुण लाड यांनी व्यक्त केला.

चौकट

फारकाळ जनतेला फसविता येत नाही

भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत बोगस घोषणा केल्या आहेत. केंद्राच्या जाचक नियमांमुळे उद्योजक अडचणीत असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. हमीभाव कागदावरच असून, तो शेतकऱ्यांना कधीच मिळाला नाही. बेरोजगारी दिवसाला वाढत असून, भांडवलदार गलेलठ्ठ होत आहेत. सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. जनतेला फसवून फारकाळ सत्ता मिळविता येत नाही, असा संदेशच पदवीधरच्या निवडणुकीतून मतदारांनी दिला आहे, अशी टीकाही लाड यांनी केली.