शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये भाजपची मुसंडी

By admin | Updated: November 4, 2015 00:13 IST

वीस ग्रामपंचायतींत कमळ फुलले : १९ राष्ट्रवादीकडे, तर ११ काँग्रेसकडे

सांगली : जिल्ह्यातील ५६ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी लागला. २२ गावांत सत्तांतर झाले. भाजपने तासगाव, पलूस, जत तालुक्यांत मुसंडी मारत २० ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलविले. १९ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे, तर ११ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात राहिल्या आहेत. चार ठिकाणी संमिश्र यश मिळाले, तर शिवसेनेने खानापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.तासगाव तालुक्यातील ३६ पैकी १९ ग्रामपंचायतींत विद्यमान कारभाऱ्यांना हादरा देत सत्तांतर घडवून आणले गेले. या निवडणुकीत राष्ट्रवादीने गड शाबूत ठेवला. भाजपला अपेक्षित यशाने हुलकावणी दिली असली तरी, त्यांनी राष्ट्रवादीच्या तोडीस तोड वर्चस्व मिळविले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्चात झालेल्या या निवडणुकांना विशेष महत्त्व होते. राष्ट्रवादीकडून आमदार सुमनताई पाटील आणि भाजपकडून खासदार संजयकाका पाटील यांनी लक्ष केंद्रित केले होते. शिरगाव(वि.), हातनोली, गोटेवाडी, धोंडेवाडी, नरसेवाडी, डोर्ली, येळावी, राजापूर, वाघापूर आणि वडगाव या दहा ग्रामपंचायतींची सत्ता आबा गटाकडून काका गटाकडे गेली, तर निंबळक, बोरगाव, पेड, धामणी, लोकरेवाडी, धुळगाव या ग्रामपंचायतींची सत्ता काका गटाकडून आबा गटाकडे आली.पलूस तालुक्यात काँग्रेसने आठ ठिकाणी विजय मिळविला, तर भाजप-राष्ट्रवादीने सहा ठिकाणी सत्ता मिळविली. भिलवडीत भाजप-राष्ट्रवादीने विजय मिळविला. माळवाडी व धनगावात सत्तांतर होऊन, त्या ग्रामपंचायती काँग्रेसकडून भाजप-राष्ट्रवादीकडे गेल्या. आंधळी, नागराळे या दोन महत्त्वाच्या गावांत काँग्रेसने सत्ता हिसकावून घेतली. कवठेमहांकाळ तालुक्यात अलकूड (एस) ग्रामपंचायतीत राजाराम जानकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनेलने सहा जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले. जत तालुक्यातील उमराणी येथे काँग्रेसने वर्चस्व कायम राखले. (प्रतिनिधी) /सविस्तर वृत्त : हॅलो सांगलीत