शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या संस्थेत भाजपची ‘एन्ट्री’

By admin | Updated: November 5, 2015 23:56 IST

इस्लामपूर बाजार समिती : विजय कुंभार, शिवाजीराव मोरे यांची संचालकपदी नियुक्ती

अशोक पाटील---इस्लामपूर  राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि विलासराव शिंदे यांचे नेतृत्व असलेल्या इस्लामपूर बाजार समितीवर पालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते विजय कुंभार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजीराव मोरे यांची शासनाने स्वीकृत संचालकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बाजार समितीत विरोधकांची ‘एन्ट्री’ झाल्याने, विरोधी बाकावर बसण्यासाठी दोन संचालक सक्रिय होणार आहेत. इस्लामपूर पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय कुंभार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे समर्थक शिवाजीराव मोरे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्वीकृत संचालकपदी निवड झाल्यानंतर कॉँग्रेस पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कॉँग्रेसचे विजय पवार यांनी बाजार समितीची निवडणूक लढवली होती. त्यांना राष्ट्रवादीच्या विरोधातील सर्वच पक्षांचा पाठिंबा होता. मात्र ते अल्पमताने पराभूत झाले. त्यांना विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनीही सहकार्य केले होते. तथापि आता कुंभार यांना संधी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे. पालिकेच्या सभागृहात कुंभार राष्ट्रवादीच्या विरोधात एकाकी लढताना दिसतात. त्यांना शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार आणि महाडिक गटाचे कपिल ओसवाल यांची साथ मिळत नसल्याने पालिकेतील विरोधी पक्ष दुबळा झाला आहे. आता मात्र त्यांना बाजार समितीतील घोटाळे बाहेर काढण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या साथीला शिवाजीराव मोरे हेही आले आहेत.बाजार समितीचे उत्पन्न कमी होत आहे. उत्पन्नवाढीच्या दृष्टिकोनातून बाजार समितीचे प्रयत्न कमी पडत आहेत. आवारातील सर्वच भूखंड राजकीय मंडळींनी हडप केले आहेत. यावर भाजपचे तत्कालीन नगरसेवक बाबा सूर्यवंशी यांनी आवाज उठविला होता. मात्र त्यानंतर विरोधकांचा आवाज दबला होता. आवाज उठविण्याची आता संधी आली आहे.उत्पन्न वाढविणार : आनंदराव पाटीलआमदार जयंत पाटील आणि विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेले संचालक बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चांगल्या दर्जाची गोदामे बांधून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्षातील कुंभार आणि मोरे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. ते त्यांची भूमिका विरोधी बाकावर बसून पार पाडतील, अशी प्रतिक्रिया इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आनंदराव पाटील यांनी दिली.