शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
3
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
4
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
5
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
6
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
8
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
9
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
10
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
11
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
12
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
13
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
14
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
15
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
16
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
17
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
18
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
19
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
20
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स

Lok Sabha Election 2019 भाजपचा निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियावरच अधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:18 IST

सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असतानाच प्रचारासाठीचे वेगवेगळे फंडे राजकीय पक्षांकडून वापरले जात आहेत. सध्या सर्वाधिक ...

सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असतानाच प्रचारासाठीचे वेगवेगळे फंडे राजकीय पक्षांकडून वापरले जात आहेत. सध्या सर्वाधिक बोलबाला असलेल्या सोशल मीडियाचाही पक्षांकडून प्रभावीपणे वापर केला जात आहे. भाजपकडून सोशल मीडियातील सर्वच माध्यमातून प्रचारावर भर दिला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची टीम मेहनत घेत आहे.लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळ येईल तसे प्रचाराची रंगत वाढत आहे. सध्या प्रत्येकाच्या हाती असलेल्या स्मार्टफोनपर्यंत प्रचार पोहोचावा यासाठी भाजपकडून यंत्रणा कार्यरत आहे. सांगली व तासगाव या दोन्ही ठिकाणाहून भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळली जात आहे.निवडणूक आयोगानेही सोशल मीडियावरील प्रचारावर करडी नजर ठेवल्याने शपथपत्रात नमूद केलेल्या संजयकाका यांच्या सोशल मीडियावरूनच प्रचार केला जात आहे. दिवसाच्या सुरूवातीला प्रचाराच्या जाहिराती तयार केल्या जातात. नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाते. सर्वात प्रथम व्हॉटस् अ‍ॅपवर हा संदेश पाठविला जातो. यासाठी दोनशेहून अधिक ग्रुप कार्यरत आहेत. इन्स्टाग्रामवरही दररोजच्या घडामोडी दिल्या जातात. सर्वच सोशल मीडियावर भाजपचा भर दिसून येत आहे.कशी चालते यंत्रणा?प्रचाराच्या धामधुमीतही दिवसभरात कोणत्या पोस्ट व्हायरल करायच्या याचे नियोजन करण्यात येते.पोस्टमध्ये प्रामुख्याने पाटील यांचा प्रचार दौरा व सभेचे वेळापत्रक प्राधान्याने दिले जाते. टष्ट्वीटरवर विकास कामांच्या पोस्ट पाठविल्या जातात.मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या पाटील यांच्या व भाजपच्या सभा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘फेसबुक लाईव्ह’चा आधार घेतला जातो. बहुतांशवेळा पाच हजारपेक्षा अधिकजण ‘लाईव्ह’ ही सभा ऐकत असतात.24,441लाईक्स संजयकाका पाटील यांच्या फेसबुकवरील अधिकृत पेजला आहेत. या पेजवर दिवसातून दोन ते पाच पोस्ट शेअर केल्या जातात, तर टष्ट्वीटरवर त्यांचे २६१२ फॉलोअर्स आहेत.26,000जणांना पाटील यांच्या माध्यमातून व्हॉट्स अ‍ॅपचे रोज संदेश पाठवले जातात. कार्यकर्ते या पोस्ट व्हायरल करतात. अधिकाधिक शेअर होण्यासाठी प्रयत्न होतात.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक