शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ््यात भाजपचा धुरळा

By admin | Updated: February 23, 2017 22:55 IST

राष्ट्रवादी-काँग्रेसचे वर्चस्व : लक्षवेधी लढतीने रंगत

विकास शहा --- शिराळा  तालुक्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपच्या कमळाला फुलू न देता आपली पंचायत समितीवरील सत्ता ७-१ ने अबाधित ठेवली. या निवडणुकीत आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र सत्यजित नाईक हे पराभूत झाले असून, वाकुर्डे बुद्रुक हा हक्काचा मतदार संघही भाजपने गमावला आहे. पंचायत समिती सभापती पदाची माळ मायावती कांबळे यांच्या गळ्यात पडली आहे. वाकुर्डे बुद्रुक पंचायत समितीसाठी आमदार नाईक यांचे पुत्र सत्यजित यांच्या विरुध्द माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे पुतणे विद्यमान सभापती सम्राटसिंग नाईक यांच्यात लढत होती. हा मतदार संघ आमदार नाईक यांचा बालेकिल्ला होता. या लढतीत सम्राटसिंग यांनी विजय मिळविला, तर मांगले जिल्हा परिषदेसाठी मानसिंगराव नाईक यांच्या भावजय अश्विनी नाईक विरुध्द जि. प. चे माजी सभापती उदयसिंगराव नाईक यांच्या स्नुषा अनन्या नाईक यांची लढत होती. काही दिवसांपूर्वी मानसिंगराव यांच्या गटातून उदयसिंगराव नाईक हे बाहेर पडून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. मात्र या ठिकाणीही मानसिंगराव नाईक यांनी बाजी मारली. वाकुर्डे बुद्रुक जिल्हा परिषद हा आमदार नाईक यांचा बालेकिल्ला तसेच गतवेळी रणधीर नाईक हे याठिकाणी विजयी झाले होते. मात्र यावेळी आशा झिमूर यांनी सुरेखा कांबळे यांचा ६८५ मतांनी पराभव केला. याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार सुनंदा झिमूर यांनी ४९० मते मिळविली. याठिकाणी पाचुंब्री हा पंचायत समिती गट भाजपने राखला. गतवेळी ही एकमेव जागा आमदार नाईक यांच्याकडे होती. यावेळी येथे सारिका पाटील यांनी १२६ मतांनी काँग्रेसच्या पौर्णिमा मोरे यांचा पराभव केला. कोकरुड जि. प. मध्ये माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजितराव देशमुख यांनी ७४0३ मतांनी अमर माने यांचा पराभव केला, तर कोकरुड पंचायत समिती गणात अमरसिंह पाटील यांनी भाजपचे विकासराव देशमुख यांचा पराभव केला. कणदूर गणामध्ये राष्ट्रवादीच्या मनीषा गुरव यांनी भाजपच्या विमल लोहार यांचा पराभव केला.आमदारपुत्रांची कहाणी चर्चेतमाजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र ‘सत्यजित’ यांचा विजय झाला, तर आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र ‘सत्यजित’ यांचा पराभव झाला. या मतदार संघात एक आमदाराचा मुलगा निवडून आला, तर दुसऱ्या आमदाराचा पडला, अशीच चर्चा सुरू होती.