शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
2
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
3
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
4
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
6
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
7
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
8
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
9
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
12
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
13
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
14
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
15
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
16
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
17
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
18
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
19
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
20
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

भाजप खासदारांचे सर्वपक्षीय प्रेम

By admin | Updated: July 2, 2015 23:38 IST

महापालिकेत अडीच कोटीची कामे : यादी नियोजन विभागाकडे

सांगली : सांगली जिल्ह्यात भाजप- राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप नेहमीच होत असतो. नेतेमंडळी उघडरित्या युती मान्य करीत नसले तरी, अनेकदा त्यांच्या कृतीतून याचा प्रत्यय येत असतो. नुकतेच जिल्हा नियोजन समितीकडून महापालिका हद्दीतील विविध विकासकामांसाठी खासदार संजय पाटील यांनी अडीच कोटीचा निधी मंजूर केला. या निधीतून सर्वाधिक कामे राष्ट्रवादी व भाजपनिष्ठ नगरसेवकांच्या प्रभागात होणार असली तरी, काँग्रेसच्या नगरसेवकांवरही अपेक्षेपेक्षा अधिक कृपादृष्टी झाली आहे. महापालिका हद्दीत रस्ते खडीकरण, गटार, हॉटमिक्स रस्ते, सामाजिक सभागृह, सांस्कृतिक हॉल अशा ३० कामांची यादी खासदार पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीकडे दिली आहे. यातील सर्वाधिक कामे राष्ट्रवादीशी निगडीत नगरसेवकांच्या प्रभागातील आहेत. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, युवराज गायकवाड, महेंद्र सावंत, राजू गवळी यांच्या प्रभागात डांबरीकरण, खडीकरणाच्या कामाचा समावेश केला आहे. तर भाजपनिष्ठ युवराज बावडेकर, वैशाली कोरे, धनपाल खोत, सुलोचना खोत यांनाही निधी देण्यात आला आहे. काँग्रेसमधील माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर, अलका पवार, हारूण शिकलगार या बड्या नगरसेवकांसह सांगलीवाडीतील कामांचा यादीत समावेश आहे. तसेच शिवराज बोळाज, बाळू गोंधळी यांच्या प्रभागात निधी दिला आहे. राष्ट्रवादी व भाजपनिष्ठ नगरसेवकांच्या वाट्याला दीड कोटीची कामे आली आहेत, तर कॉँग्रेसच्या वाट्याला एक कोटीचा निधी मिळाला आहे. (प्रतिनिधी)गुंठेवारीसाठी २५ लाखखासदार पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील गुंठेवारी भागाची पाहणी केली. या भागातील नागरिकांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. त्याची दखल घेऊन खा. पाटील यांनी तातडीने गुंठेवारी भागात मुरूम टाकण्यासाठी खासदार निधीतील २५ लाख रुपये मंजूर केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना हा निधी पालिकेकडे वर्ग करण्याची सूचनाही केल्याचे सांगितले.