इस्लामपूर येथे मंदिर उघडण्यासाठी भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय हवलदार,अरुण शिंगण, अशोक खोत, प्रवीण परीट, स्मिता पवार, अक्षय कोळेकर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील धार्मिक स्थळे दर्शनासाठी भक्तांना खुली करण्यात यावीत. या मागणीसाठी भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या मंदिर बंद ठेवण्याच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व नगराध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजाभवानी मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनासारख्या विषाणूच्या प्रसारामुळे धार्मिक स्थळे पूर्णत: बंद आहेत. या कोरोनाकाळात बंदी असतानाही अवैद्य दारू वाहतूक व विक्री सुरू आहे. मात्र, राज्यातील धार्मिक स्थळे भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात आलेली नाहीत. राज्य शासनाकडे भक्तांच्या भावनेकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
शहरातील तुळजाभवानी मंदिराबाहेर शंखनाद आंदोलन करून देवीची आरती करण्यात आली. या आंदोलनात साधू, महंत, वारकरी, भक्त सहभागी झाले होते. यावेळी अशोक खोत, स्मिता पवार, संजय हवलदार, अरुण शिंगण, संदीपराज पवार, प्रवीण परीट, मुकुंद रासकर, रामभाऊ शेवाळे, विकास परीट, अक्षय कोळेकर, सुयश पाटील, फिरोज मुंडे, सोमनाथ जाधव, अभिजीत खडके, महेश जवादे, करण बडे, रशीद वारूसे सहभागी झाले होते.