जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी भाजपची विचारधारा सांगितली. नगरसेविका सविता मदने यांनी २०१४ नंतर बदललेले राजकारण याबाबत माहिती दिली. भाजप सोशल मीडियाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संकेत कुलकर्णी यांनी सोशल मीडियाचा वापर, त्यातील बारकावे याबाबत माहिती दिली. जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांनी कार्यकर्ता व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. स्वाती शिंदे यांच्या हस्ते महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी शहर अध्यक्षा रुपाली गाडवे, रुपाली देसाई, लतिका शेंगणे, दीपाली जाधव, अनुजा कपूर उपस्थित होत्या.
यावेळी आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र नातू, बाबासाहेब आळतेकर, नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, गणेश माळी, डॉ. भालचंद्र साठ्ये, ओंकार शुक्ल, शंकर इसापुरे, दिगंबर जाधव, सुमेध ठाणेदार, संदीप सलगर, रोहित चिवटे, गजेंद्र कुल्लोळी, उमेश हारगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महेश फोंडे व राज कबाडे यांनी संयोजन केले. स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांनी आभार मानले.