शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : तासगाव नगरपालिकेचे वेध लागले असतानाच, शहरातील भाजपचे काही कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. मुंबई ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तासगाव : तासगाव नगरपालिकेचे वेध लागले असतानाच, शहरातील भाजपचे काही कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. मुंबई येथे शिवसेना नेते दिवाकर रावते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

खासदार संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर तासगाव तालुक्यात शिवसेनेची मोर्चेबांधणी करण्यास चांगलीच सुरुवात झाल्याचे चित्र आहे. तासगाव नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर तासगाव शहरात शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. तासगाव शहरातील भाजपचे कार्यकर्ते तसेच शहरात सामाजिक संस्थेचे काम करणारे काही पदाधिकारी यांनी मुंबई येथे शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.

हेल्पिंग हँड्स या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल शिंदे, राजू मुल्ला, सुशांत पैलवान, प्रशांत पाटील, कृष्णात माळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते, तासगावचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत माळी, आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप माने, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय चव्हाण उपस्थित होते.