शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

निशिकांत पाटील धमकी प्रकरणावरून भाजपचे कार्यकर्ते संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहराचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांना व्हॉटस‌्ॲप संदेशाद्वारे आलेल्या धमकीवरून तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शहराचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांना व्हॉटस‌्ॲप संदेशाद्वारे आलेल्या धमकीवरून तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तालुक्याच्या विविध गावांतून धमकी देणाऱ्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून या घटनेचा निषेध करण्यात आला.

येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना निवेदन देत या धमकी प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दीड महिन्यापासून या प्रकरणावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. धमकीच्या संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत. भाजपचे कार्यकर्ते असल्या विकृत धमक्यांना भीक घालणार नाहीत. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार यांनी दिला आहे.

यावेळी अशोक खोत, गौरव खेतमर, सुभाष शिंगण, प्रवीण परीट, भास्कर मोरे, सतेज पाटील, अक्षय कोळेकर, फिरोज पटेल, विकास परीट, फिरोज मुंडे उपस्थित होते.

दरम्यान, धमकीचे पडसाद गावोगावी उमटले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी धमकी देणाऱ्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून या घटनेचा निषेध केला.