शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, राष्ट्रवादीचे निवडणुकीसाठी स्टार्टअप

By admin | Updated: January 28, 2016 00:15 IST

तासगाव नगरपालिका : नेत्यांकडून सत्ता काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी

दत्ता पाटील -- तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीला आणखी काही महिन्यांचा अवधी आहे. मात्र आतापासूनच भाजप आणि राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी स्टार्टअप केल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीने खासदार सुप्रिया सुळे यांना, तर भाजपने गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना तासगावात आणून नगरपालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचे संकेत दिले आहेत.तासगाव नगरपालिकेतील विद्यमान कारभाऱ्यांची मुदत आॅक्टोबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजत आहेत. पालिकेच्या राजकारणात चार वर्षात मोठी राजकीय स्थित्यंतरे झालेली आहेत. या स्थित्यंतरांमुळे पालिकेची निवडणूक कशी होणार? याचे मोठे औत्सुक्य आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पालिकेतील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी निष्ठा असलेल्या काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात आली. आता भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली जात आहे. केंद्रात आणि राज्यात असलेल्या सत्तेचा पुरेपुर फायदा घेऊन पुढची पाच वर्षे भाजपचा झेंडा फडकवण्याचा भाजपच्या नेत्यांचा इरादा आहे.शहरातील पाणी योजनेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गृहराज्यमंत्र्यांचा तासगाव दौरा झाला. या दौऱ्यात गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे तासगाव पालिकेच्या निवडणुकीतही भाजपची सत्ता येईल, त्यासाठी मागणी होईल, तेवढा निधी प्राधान्याने देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. तर खासदार संजयकाका पाटील यांनीही पालिकेच्या निवडणुकीचा उल्लेख करुन निवडणुकीपूर्वी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांच्या दौरा पालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठीच होता, हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव शहरात राष्ट्रवादीला अनेक धक्के बसले आहेत. आता या धक्क्यातून सावरलेल्या राष्ट्रवादीनेही पालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील काही शिलेदार भाजपमध्ये गेले, तर राष्ट्रवादीत असलेल्या काही शिलेदारांनी बॅकफूटवरच राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी पालिकेच्या निवडणुसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सुप्रिया सुळे यांचा तासगाव दौरा शहरातील कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठीच असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीने जोरदार रॅली काढून खासदार सुळे यांचे स्वागत करुन शहरातील राष्ट्रवादीत अजूनही जोश असल्याचे दाखवून दिलेच. किंबहुना खासदार सुळे यांनीही भाषणाच्या शेवटी निवडणुकीचा उल्लेख जाणीवपूर्वक केला. अजून निवडणुका लांब असल्याने सर्वांशी गोडच बोला, बाकीचे निवडणुकीवेळी पाहू, असा सूचक इशारा देऊन पवार कुटुंबियांचेही पालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष असल्याचे स्पष्ट केले. एकंदरीत निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच भाजप आणि राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणीस चांगलीच सुरुवात झाली आहे. तरीही उरलेल्या काही महिन्यांत तासगावात आणखी काही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.