अनेक संघटना व राजकीय पक्षांनी वीज बिल माफीची मागणी करूनही राज्य शासनाने वीज बिले माफ केली नाही. उलट वीज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला. महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या विरोधात बेडग येथे भाजपचे आमदार सुरेश खाडे, उमेश पाटील यांच्या वतीने टाळे ठोको आंदोलन करून बेडग महावितरण उपकेंद्रातील अधिकारी जेरीमलली यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात आमदार सुरेश खाडे, मोहन व्हनखडे, भाजप नेते उमेश पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज मुंडगनूर, सरिता कोरबू, उमेश हारगे, शंकर शिंदे, आप्पा पाटील, बाबासाहेब आळतेकर, नंदू शिंदे, भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.
फोटो : ०५ मिरज १
ओळ : बेडग (ता. मिरज) येथे वीज बिल माफीच्या मागणीसाठी भाजपचे आमदार सुरेश खाडे, उमेश पाटील, नंदू शिंदे व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.