शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘बाजार समिती’साठी भाजप घेणार काँग्रेस विरोधकांची सोबत

By admin | Updated: June 26, 2015 00:37 IST

निवडणूक : ‘भाजप’च्या बैठकीस घोरपडेंची दांडी

मिरज : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी गुरुवारी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. खा. संजय पाटील यांच्यासह भाजप आमदारांच्या बैठकीत काँग्रेस विरोधकांना सोबत घेऊन ताकदीने बाजार समिती निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला. माजी मंत्री अजितराव घोरपडे बैठकीस अनुपस्थित होते.बाजार समिती निवडणुकीसाठी गुरुवारी ९१ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. ग्रामपंचायत व भटक्या-विमुक्त गटातून सरदार संपतराव पाटील व बसाप्पा सिद्धाप्पा बेडगे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणुकीबाबत मिरजेतील विश्रामगृहात भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, ओंकार शुक्ल यांच्यासह पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. बाजार समितीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व विरोधकांना सोबत घेऊन ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्णय बैठकीत झाला. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. घोरपडे यांना बैठकीस पाचारण करण्यात आले होते. मात्र, ते बैठकीस अनुपस्थित होते. अजितराव घोरपडे काँग्रेसच्या संपर्कात असल्याने भाजपच्या नेत्यांनी त्यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, घोरपडे यांनी भाजपच्या नेत्यांना प्रतिसाद दिलेला नाही. (वार्ताहर)