शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सर्वच आघाड्यांवर अपयशी

By admin | Updated: November 4, 2015 23:58 IST

सुमनताई पाटील : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा

कवठेमहांकाळ : दुष्काळग्रस्त जनतेच्या व्यथा शासनदरबारी मांडण्यासाठी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील तसेच विजय सगरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार सचिन डोंगरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सकाळी साडेअकराला मल्लिकार्जुन देवालयाजवळ पावणेबारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. भाजप सरकारविरोधात थाळीनाद करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा मोर्चा युववाणी चौक, शिवाजी चैक, हरि मंदिर या मार्गावरून तहसी कार्यालयाकडे वळला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.यावेळी आ. सुमनताई पाटील म्हणाल्या की, भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर कामे करण्यात अपयशी ठरले आहे. भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. राज्यात महागाई वाढली आहे, सिंचन योजना बंद पडल्या आहेत, शेतकरी कर्जबाजारी होत आहेत, जनावरांचे चाऱ्याविना हाल सुरू आहेत. विजय सगरे म्हणाले की, भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. भाजपच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सरकारने डिझेल, पेट्रोलवरचा अधिभार कमी करावा, सिंचन योजनांसाठी निधी द्यावा.राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष नामदेव करगणे म्हणाले की, भाजप सरकार जातीयवादी लोकांचे सरकार आहे. ते भांडवलदारांना पोसत आहे. अशा सरकारला राष्ट्रवादी धडा शिकविल्यशिवाय स्वस्थ बसणार नाही.यावेळी टी. व्ही. पाटील, गणेश पाटील, सुरेखा कोळेकर आदींची भाषणे झाली. या मोर्चासाठी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, गणपती सगरे, सुरेश पाटील, नारायण पवार, जालिंदर देसाई, सुहास पाटील, कल्पना घागरे, चंद्रकांत सगरे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)