शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेता पदासाठी भाजप दावेदार!

By admin | Updated: March 7, 2017 22:27 IST

जिल्हा परिषद : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच काँगे्रसने हे पदही हरपण्याची शक्यता

सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात काँगे्रस पहिल्यांदाच सात इतक्या कमी निच्चांकी सदस्य संख्येवर घसरली. तर गत निवडणुकीत अवघा एक सदस्य निवडून आलेल्या भाजपने मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य पातळीवरून काँगे्रस व राष्ट्रवादी या दोन पक्षांनी एकत्रित राहण्याच्या सूचना होत असल्याने जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी व काँगे्रस हे दोन पक्ष एकत्र राहण्याची शक्यता जास्त आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची बहुमताची सत्ता असली तरी काँगे्रसही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात हात घालून काम करण्याच्या तयारीला लागल्याचे सध्याच्या राजकीय हालचालींवरून समोर येत आहे.या परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद भाजपलाच मिळणार, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. भाजपनेही त्यासाठी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. भाजप, शिवसेना व सातारा विकास आघाडी हे तीन पक्ष एकत्रितपणे प्रबळ विरोधकाची भूमिका निभावणार आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने वर्णे, वनवासवाडी, कुकुडवाड, कुडाळ, सैदापूर, कार्वे, रेठरे बुद्रुक या गटांवर कब्जा मिळविला आहे. शिवसेनेला तळदेव, मारुल हवेली, काळगाव व मल्हारपेठ या गटांवर ताबा मिळवला आहे. सातारा विकास आघाडीने कोडोली, शाहूपुरी, नागठाणे या गटांत आपले उमेदवार निवडून आणले आहेत. या सर्वांची बेरीज केली तर ती ११ इतकी होत आहे. ही संख्या काँगे्रसच्या सदस्य संख्येपेक्षा ४ ने जास्त आहे. साहजिकच, काँगे्रसने विरोधी पक्षनेतेपदही गमावले आहे. या पदावर भाजपच दावा करत आहे. याउलट काँगे्रसचे नेतेमंडळी मात्र पराभव जिव्हारी लागल्याने पुरतेच चिंतेत आहेत. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्हावासीयांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात सत्ता टाकली. ६४ गटांपैकी तब्बल ३९ गट राष्ट्रवादीच्या ताब्यात आले. शिरवळ गटातील उदय कबुले या अपक्ष सदस्यांनी देखील राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केल्याने राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या ही ४० इतकी झाली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला बहुमतासाठी इतरांची मदत घ्यावी लागत होती. यावेळी मात्र राष्ट्रवादीचे पूर्ण बहुमत आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आमच्यासोबत राहील. शिवसेनेचे चार व आमचे सात सदस्य एकत्रित काम करतील. सातारा तालुक्यात सातारा विकास आघाडीसोबत आम्ही काही जागांवर निवडणूक लढविली. त्यांचेही तीन सदस्य निवडून आले आहेत. सातारा विकास आघाडीही आमच्यासोबत राहील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमचे सदस्य प्रबळ विरोधकाची भूमिका बजावतील. - विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजपजातीयवादी पक्षांविरोधात दोन्ही काँगे्रस एकत्रितपणे काम करतील. कऱ्हाड दक्षिणमध्ये जातीयवादी पक्षांना थोपविण्यासाठी पृथ्वीराजबाबांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. ऐन निवडणुकीत उंदीर काँगे्रसच्या जहाजातून बाहेर पडले आहेत. - आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष, काँगे्रस