शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरवडेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : आरवडे (ता. तासगाव) येथे राजकीय वादातून आमदार सुमनताई पाटील व खासदार संजयकाका पाटील यांच्या गटात बुधवारी जोरदार हाणामारी झाली.खासदार गटाचे संभाजी मस्के यांनी केलेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले. जखमींना तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर, रुग्णालयात घुसून पुन्हा त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी भाजपा समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : आरवडे (ता. तासगाव) येथे राजकीय वादातून आमदार सुमनताई पाटील व खासदार संजयकाका पाटील यांच्या गटात बुधवारी जोरदार हाणामारी झाली.खासदार गटाचे संभाजी मस्के यांनी केलेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले. जखमींना तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर, रुग्णालयात घुसून पुन्हा त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी भाजपा समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत सरपंच युवराज पाटील गंभीर जखमी झाले. या मारहाणीत काठ्या, गज, दगड व रिव्हॉल्व्हरचा वापर केला. दरम्यान, बंदोबस्तावरील पोलिसांनाही कॉलर पकडून शिवीगाळ केल्याने गावात तणाव आहे. आमदार सुमनताई पाटील यांनी रुग्णालयास भेट देऊन जखमींची विचारपूस केली. जखमींमध्ये सरपंच युवराज पाटील, किसन रंगराव कुंभार, राहुल किसन कुंभार, रामचंद्र दामोदर कुंभार यांचा समावेश आहे.सरपंच पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरवडेत आमदार गटाची सत्ता आली असून खासदार गट पराभूत झाला आहे. आमदार गटाकड़ून लता किसन कुंभार विजयी झाल्या. याचा राग विरोधी गटाच्या संभाजी मस्के व अन्य उमेदवारांना होता. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता कुंभार यांचे पती किसन कुंभार व मुलगा राहुल कुंभार गावातील बसस्थानक चौकातील मोटार दुरुस्तीच्या दुकानात बसले होते. यावेळी मस्के आपल्या समर्थकांसह तिथे आले व त्यांनी कुंभार पिता-पुत्रास काठ्या व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. त्यांची आरडाओरड ऐकून गावात बंदोबस्तासाठी असणारे पोलिस व काही तरुणांनी बसस्थानक चौकात धाव घेऊन हाणामारी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हल्लेखोरांनी पोलिसांचीही कॉलर धरून त्यांना अर्वाच्च शिवीगाळ केली. यादरम्यान, हाणामारीची छायाचित्रे काढणाºयालाही बेदम मारहाण करण्यात आली.युवराज पाटील व अविनाश पाटील यांना पाहून मस्के व त्यांच्या समर्थकांनी पुन्हा गोंधळ सुरू केला. मस्के याने युवराज पाटील यांना शिवीगाळ करीत डोक्यात दगड घातला. यात ते गंभीर जखमी झाले. वाद थांबवा म्हणून सांगणाºया अविनाश पाटील यांच्या दिशेनेही दगड फेकत मस्के याने अंगावर धावून येत शिवीगाळ केली.दरम्यान, सरपंच पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच त्यांचे समर्थक रुग्णालयाकडे धावले. जमावाने तेथे उभ्या केलेल्या मोटारीवर दगडफेक केली.गावात तणाव : घटनेनंतर रुग्णालय परिसर व आरवडे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.