शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध सेवाश्रमात विनायक लिमये यांची जन्मशताब्दी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST

ओळ : कुपवाड वृद्ध सेवाश्रम येथे विनायक लिमये यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी माजी आमदार प्रा. ...

ओळ : कुपवाड वृद्ध सेवाश्रम येथे विनायक लिमये यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील, नाना गोखले, डॉ. उदय जगदाळे, प्रकाश काळे आदीं उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : शहरातील वृद्ध सेवाश्रम येथे ‘डाय विथ डिग्निटी’ संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते विनायक राजाराम लिमये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील, लिमये यांचे नातेवाईक व नाना गोखले प्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रा. पाटील म्हणाले की, विनायक लिमये हे एक मनस्वी व्यक्तिमत्त्व होते. लहानपणीच आईवडलांचे निधन झाल्याने ते एकटेच राहत होते. या कारणामुळेच त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहणे पसंद केले. लिमये यांनी इच्छा मरणासाठी प्रत्येकाला स्वातंत्र्य व अधिकार असावा या मागणीसाठी ‘डाय विथ डिग्निटी’ या संघटनेचे अनेक वर्षे सक्रिय कार्य केले होते. आत्महत्या करणे हा गुन्हा समजला जातो. त्यामुळे स्वेच्छामरणाचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी ते आयुष्यभर झगडले. लिमये यांनी वृद्धाश्रमाला पाच गुंठे प्लॉट दान म्हणून दिला आहे. अशा या मनस्वी, दानशूर व कोणीही नसलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा आज जन्मशताब्दी सोहळा वृद्धासेवाश्रमात साजरा करण्यात आला.

या संस्थेच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना आदरांजली वाहण्याचे कामही संस्था करणार आहे. यावेळी लिमये यांचे नातेवाईक नाना गोखले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश काळे यांनी आभार मानले. संचालक अशोकराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. उदय जगदाळे, शशिकांत गायकवाड, दादासाहेब पाटील, रमेश सायमोते, वि. द. बर्वे, रेखा माळी, आप्पा ओलेकर, वृद्धाश्रमातील सर्व आश्रित उपस्थित होते.