शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

बिरोबा सोसायटीची ९३ वर्षांनी निवडणूक

By admin | Updated: October 31, 2015 00:09 IST

बोरगावात चुरस : चुलत बंधू आमने-सामने

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील बिरोबा विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक तब्बल ९३ वर्षांनी होत आहे. या निवडणुकीत चुलत बंधू आमने-सामने आल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे तालुक्याच्या नजरा लागल्या आहेत. बोरगाव हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव मानले जाते. या गावातील सर्व सेवा सोसायट्या, पतसंस्थेच्या निवडणुका बिनविरोध होत असताना, तब्बल ९३ वर्षांनी बिरोबा विकास सेवा सोसायटीची निवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीच्या दोन गटात ही निवडणूक होत आहे. कृष्णा कारखान्याचे माजी संचालक उदयसिंह शिंदे यांचे बिरोबा विकास पॅनेल व माजी सरपंच प्रकाश पाटील यांचे लोकनेते राजारामबापू सहकार पॅनेल यांच्यात दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे गावाबरोबरच तालुक्याच्या नजरा या निवडणुकीकडे आहेत. उदयसिंह शिंदे हे एकाकी पडले असून प्रकाश पाटील यांच्या पॅनेलला काँग्रेससह इतर पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. उदयसिंह शिंदे यांच्या बिरोबा विकास सोसायटी पॅनेलला ‘नारळ’ हे चिन्ह असून, प्रकाश पाटील यांच्या राजारामबापू पॅनेलला कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. १ नोव्हेंबरला निवडणूक होत असून प्रचार व मतदारांच्या गाठीभेटी, बैठकांमुळे निवडणुकीत रंग भरला आहे. वैयक्तिक भेटीगाठीवर भर देण्यात आला असून, सभासद फोडाफोडीला दोन्ही गटाकडून सुरुवात झाली आहे. एकूणच सोसायटीची सत्ता कोणाकडे जाणार, यावर पैजा लागल्या असून साऱ्या तालुक्याचे लक्ष निवडणुकीकडे लागून राहिले आहे. (वार्ताहर) निवडणूक प्रतिष्ठेची प्रकाश पाटील यांच्याकडे तगडे उमेदवार व सर्व नेत्यांची ताकद आहे, तर उदयसिंह शिंदे यांच्याकडे अनेक वर्षांच्या वडिलोपार्जित एकहाती सत्तेचा अनुभव आहे. एकूणच ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असून, प्रतिष्ठेची बनली आहे.