शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी जैवविविधता पार्क उभारणार

By admin | Updated: February 11, 2016 23:33 IST

शेखर गायकवाड : खंबाळे व बोलवाडला प्रकल्प होणार

सांगली : सामाजिक वनीकरण विभागातर्फे नव्याने राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनांनुसार उत्तमराव पाटील वन उद्यान निर्मिती योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याव्दारे जैवविविधता व निसर्ग संरक्षण करणाऱ्या योजनांचा समावेश असून, यातून जिल्ह्यातील खंबाळे (ता. खानापूर) व बोलवाड (ता. मिरज) याठिकाणी जैवविविधता पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले की, शासनाच्या निर्णयानुसार सामाजिक वनीकरणातर्फे सहा महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार असून, यातील उत्तमराव पाटील वन उद्यान निर्मिती योजनेतून जिल्ह्यात वन व वनेतर जमिनीवर जैवविविधता व निर्सग संवर्धनासाठीचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. योजनेचे स्वरुप स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात दोन असे ६८ उद्याने उभारण्यात येणार असून, यात पर्यावरणपूरक उपकरणे उभारणी करून निसर्ग संवर्धनाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उद्यानात औषधी वनस्पती उद्याने, फुलपाखरू उद्यान, दिशा उपदिशा उद्यान, स्मृतिवने, सुगंधीद्रव्य उद्यान, बांबू सेटम, काटेरी झुडपी वृक्ष समूह यातून पर्यावरण अभ्यासास चालना देण्यात येणार आहे. याठिकाणी मुलांसाठी मनोरंजन खेळणी, ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती व फिरण्यासाठी निसर्ग पायवाटा आदी सुविधा पुरविण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी तासगाव विटा मार्गावरील खंबाळे येथील व बोलवाड (ता. मिरज) येथील ११ एकर जागेची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या निधी प्राप्त झाला असून, आठवडाभरात कामास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक वनीकरणचे उपसंचालक विश्वास जवळेकर, प्रमोद चौगुले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)