शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अग्रण धुळगाव येथे २५ एकरमध्ये साकारणार जैवविविधता उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जैवविविधता उद्यान अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे तयार करण्यात येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जैवविविधता उद्यान अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे तयार करण्यात येत आहे. २५ एकर क्षेत्रात विविध प्रजातींची १६ हजार झाडे लावली जातील. अभिनेते सयाजी शिंदे यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.

शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात अशी देवराई निर्माण केली आहे, तशीच आता अग्रण धुळगावमध्येही दिसेल. त्याच्या तयारीसाठीची व्यापक बैठक शनिवारी ऑनलाइन स्वरूपात झाली. सह्याद्री देवराईचे अध्यक्ष तथा अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह लेखक अरविंद जगताप, उपवन संरक्षक विजय माने, मधुकर फल्ले, सचिन चंदने, विजय निंबाळकर, वनस्पतीशास्त्रज्ञ सुहास वायंगणकर, शिल्पकार किशोर ठाकूर, चित्रकार केशव कासार, अग्रणी फाउंडेशनचे शिवदास भोसले आदी सहभागी झाले.

अग्रण धुळगावपासून अर्धा किलोमीटर अंतरावर उद्यान साकारत आहे. वृक्षारोपणासाठी वनविभागाने खड्डे काढले आहेत. विविध १५० प्रजातींची झाडे सह्याद्री देवराईकडून दिली जातील, त्यातील २० प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावरील आहेत. पाणीपुरवठ्यासाठी ठिबक व अन्य अनुषंगिक खर्चही देवराई करणार आहे. झाडे लावण्याच्या मोहिमेत स्थानिक स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे, विद्यार्थी व वृक्षप्रेमी सहभागी होत आहेत.

येत्या आठवड्यात प्रत्यक्ष वृक्षारोपणाला प्रारंभ होणार आहे. झाडांच्या संगोपनासाठी अग्रणी पाणी फाउंडेशन, सह्याद्री देवराई तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. सांगली जिल्ह्यात या प्रकारचे हे पहिलेच इतके मोठे जैवविविधता उद्यान असल्याचे फाउंडेशनचे शिवदास भोसले यांनी सांगितले.

चौकट

१५० प्रजातींची झाडे

२५ एकर क्षेत्र वनविभागाच्या मालकीचे आहे. त्यामध्ये विविध सहा उद्याने तयार केली जातील. आयुर्वेदिक वनस्पती, फळझाडे, लहान मुलांसाठी व वृद्धांसाठी उद्याने, ऑक्सिजन देणारी १५० प्रजातींची झाडे लाऊन वैविध्य राखले जाणार आहे.