शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

विट्यात अनिल म. बाबर यांचा अर्ज अवैध

By admin | Updated: November 2, 2016 23:45 IST

विकास आघाडीला धक्का : छाननीत ९९ अर्ज बाद, नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत

 विटा : विटा नगरपरिषद निवडणुकीतील सत्ताधारी कॉँग्रेस व विकास आघाडीच्या युतीचे प्रमुख उमेदवार अनिल मनोहर बाबर यांचा उमेदवारी अर्ज छाननीत अवैध झाला. नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारांनी दाखल केलेल्या सात अर्जांपैकी कॉँग्रेसच्या सौ. जयश्रीताई सदाशिवराव पाटील व शिवसेनेच्या सविता तानाजी जाधव यांचे अर्जही एबी फॉर्म नसल्याने अवैध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी जाहीर केले. नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले होते. तर नगरसेवक पदासाठी १९० उमेदवारी अर्ज दाखल होते. बुधवारी सकाळी पालिका सभागृहात अर्जांची छाननी झाली. त्यावेळी कॉँग्रेस, शिवसेना, भाजप, रासप, विकास आघाडी यासह अपक्ष उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी प्रभागनिहाय अर्जांची छाननी केली. यावेळी कॉँग्रेसचे वैभव पाटील, किरण तारळेकर, शिवसेनेचे अमोल बाबर, भाजपचे दिलीप आमणे, अ‍ॅड. विनोद गोसावी, रासपचे शिवाजीराव हारूगडे आदी प्रमुख उपस्थित होते. या छाननीवेळी सारिका सपकाळ, मीनाक्षी पाटील, नेहा डोंबे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली. पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाच्या अर्जांची छाननी झाली. कॉँग्रेसमधून सौ. जयश्रीताई पाटील व त्यांच्या स्नुषा सौ. प्रतिभा पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु, प्रतिभा पाटील यांच्या अर्जाला पक्षाचा एबी फॉर्म जोडण्यात आल्याने सौ. जयश्री पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. शिवसेनेतून आ. अनिल बाबर यांच्या स्नुषा सौ. शीतल अमोल बाबर व सविता तानाजी जाधव यांचे अर्ज होते. यावेळी सविता जाधव यांच्या अर्जाला शिवसेनेचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अवैध झाला, तर रासपमधून पूजा तारळेकर यांचा अर्ज वैध ठरला आहे. विटा नगरपरिषदेच्या १२ प्रभागातील २४ जागांसाठी १९० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. प्रभाग क्र. २ ब मधून विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील व उपनगराध्यक्ष अ‍ॅड. सचिन जाधव यांनी कॉँग्रेसच्या प्रमुख उमेदवारासाठी पर्यायी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जाला पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने या दोघांचेही अर्ज अवैध झाले, तर प्रभाग क्र. ९ ब मधील कॉँग्रेसचे प्रमुख उमेदवार अ‍ॅड. अजित गायकवाड यांना पर्यायी अर्ज दाखल केलेले अशोकराव गायकवाड यांच्या अर्जाला एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्जही अवैध झाला. कॉँग्रेस व विकास आघाडीचे प्रमुख उमेदवार विद्यमान नगरसेवक अनिल मनोहर बाबर यांनी विकास आघाडीतून एकच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्या अर्जावर बाबर यांची सही नसल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आला. हा निर्णय कॉँग्रेस व विकास आघाडीला धक्कादायक समजला जातो. परंतु, या निर्णयाविरुध्द अनिल म. बाबर यांनी न्यायालयात अपील दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. छाननीत नगराध्यक्षपदाचे पाच उमेदवारांचे सातपैकी चार, तर नगरसेवक पदाचे एकूण ९९ अर्ज अवैध झाले आहेत. (वार्ताहर) अमोल बाबर विरुद्ध नंदू पाटील शिवसेनेचे प्रमुख उमेदवार अमोल अनिल बाबर यांचा प्रभाग २ ब मधील अर्ज वैध झाल्याने त्याठिकाणी कॉँग्रेसचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील विरुध्द शिवसेनेचे अमोल बाबर असा सामना रंगणार आहे. ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.