----------------------
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
मिरज : मिरज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कुमार शिवाजी पाटील (रा. लक्ष्मीनगर, नरवाड) याच्याविरुद्ध पीडितेच्या आईने ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही घरात एकटी असताना पाटील याने घरात येऊन पीडितेला चल पळून जावू, असा आग्रह केला. पीडितेने नकार दिल्याने पाटील याने तिचा विनयभंग केल्याचे पीडितेच्या आईने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
----------------
अपघातात पादचारी जखमी
मिरज : मिरज-तासगाव रस्त्यावरुन चालत जाणार्या केशव एकनाथ जाधव या पादचाऱ्यास अज्ञात वाहनाने ठोकरल्याने ते जखमी झाले. याबाबत योगेश जाधव यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केशव जाधव हे रस्त्यावरुन चालत जाताना त्यांना वाहनाने ठोकर देऊन पलायन केले. अपघातात ते गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
-----------------