शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या मातीत क्रांतीची मोठी शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:11 IST

वाळवा : सांगली जिल्ह्याच्या मातीत क्रांतीची मोठी शक्ती आहे. या राज्याला ताठ मानेने उभे करणाऱ्या सहकाराची नाळ ही प्रत्यक्ष ...

वाळवा : सांगली जिल्ह्याच्या मातीत क्रांतीची मोठी शक्ती आहे. या राज्याला ताठ मानेने उभे करणाऱ्या सहकाराची नाळ ही प्रत्यक्ष समाजजीवनाशी जोडलेली आहे. ती बिघडली तर समाज बिघडायला व उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी केले.वाळवा येथे रविवारी पोपटराव पवार यांना यावर्षीचा ‘अरुणभैया नायकवडी राज्यस्तरीय पुरस्कार’ हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि रोख पंचवीस हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच यावर्षीचे ‘अरुणभैया नायकवडी पारितोषिक’ दापोली कृषी विद्यापीठातील एम.एस्सी. अ‍ॅग्रीमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी अंकिता कोळी (उरण, जि. रायगड) हिला पोपटराव पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, रोख दहा हजार रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप होते. यावेळी पोपटराव पवार म्हणाले, राष्ट्रपुरुषांची ‘ग्रामगीता’ आणि दुष्काळ व दुष्काळग्रस्त यांचे चिंतन करायला लावणारा ‘शेतकºयांचा आसूड’ हे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. जात, पुण्यतिथी, जयंती यापलीकडे आपण राष्ट्रपुरुषांना घेऊनच गेलो नाही. महाराष्ट्रात जलसंधारणाची हाक माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिली. स्वच्छता अभियानाची हाक आर. आर. पाटील यांनी दिली. स्वातंत्र्याच्या क्रांतीची हाक नाना पाटील यांनी दिली. रोजगार हमी योजनेची हाक वि. स. पागे यांनी दिली.या मातीत क्रांतीची मोठी शक्ती आहे. यापुढे राजकीय सत्ता ज्याची, तिकडेच पाणी पळणार आहे. त्यामुळे कृषी विकास आणि ग्राम विकास संघटना जिवंत ठेवणे गरजेचे आहे.