शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

मुलांच्या अभिव्यक्तीला प्रसारमाध्यमात मोठी संधी

By admin | Updated: January 22, 2016 01:04 IST

गोविंद गोडबोले : धनगावात बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात; काव्यसंमेलन, एकपात्रीचे आयोजन

भिलवडी : आजचे युग हे प्रसारमाध्यमांचे युग आहे. येत्या काही वर्षांत प्रसारमाध्यमांत मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असून, मुलांना अभिव्यक्त होता आले पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष व बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांनी केले. धनगाव (ता. पलूस) येथे साने गुरूजी संस्कार केंद्र, भिलवडी व जि. प. प्राथमिक शाळा यांच्यावतीने आयोजित पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनामध्ये ते बोलत होते. गोडबोले म्हणाले, कोणतीही कला वाईट असत नाही. बालवयातूनच मुलांनी एखादी कला किंवा छंद जोपासावा. मुलांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनीही प्रयत्नशील राहावे. स्वागताध्यक्ष सुभाष कवडे यांनी, बुध्दी आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी साहित्याला पर्याय नसून, मातृभाषा हे संस्काराचे माध्यम असल्याचे प्रतिपादन केले. संमेलनाच्या उद्घाटक सुनीता चितळे यांनी, आई-वडिलांना मुलांसाठी वेळ नसल्याने संस्कार केंद्रांची गरच असल्याचे मत व्यक्त केले. तिसऱ्या सत्रात ‘आनंददायी शिक्षणासाठी साहित्य’ या विषयावर बालसाहित्यिका व कवयित्री सौ. वर्षा चौगुले यांची प्रतीक्षा पवार, आदिती माने, आकांक्षा जाधव, श्रुतिका यादव यांच्यासह उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रकट मुलाखत घेतली. बालसाहित्यिका सौ. मीनाक्षी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व कवी संदीप नाझरे यांच्या उपस्थितीत ‘किलबिल गाणी’ हे काव्यसंमेलन पार पडले. संदीप नाझरे यांनी ‘रुसलेली कळी’ ही कविता सादर केली. सरोज गुरव, उत्कला आढाव या शिक्षकांसह पारस साळुंखे, श्रुती पाटील, सायली अनुगडे, प्रतीक्षा पवार, साक्षी फडतरे, सिध्दी साळुंखे, अंजली माने, विभावरी उतळे, तुषार पाटील यांच्यासह २७ बालकवींनी यात सहभाग घेतला. ‘धमाल गोष्टी’ या सत्रात सौ. भाग्यश्री चौगुले यांनी सादर केलेल्या प्रापंचिक गमती-जमतीवरील एकपात्री प्रयोगाने धमाल उडवून दिली. अध्यक्ष ‘हास्ययात्रा’कार शरद जाधव यांनी हास्याचे उत्तम आरोग्यासाठीचे महत्त्व विषद केले. धनगावच्या सरपंच सौ. सुवर्णा पाटील, उपसरपंच घन:श्याम साळुंखे, दीपक भोसले, दत्ता उतळे, सचिन साळुंखे, संभाजी साळुंखे, संजय रोकडे, बाळासाहेब कांबळे, डॉ. सुमित साळुंखे, अशोक साळुंखे, शरद साळुंखे, संभाजी यादव, सौ. जिजाबाई साळुंखे, अपर्णा हिरूगडे, वंदना जाधव उपस्थित होते. मुख्याध्यापक कोंडीराम यादव, दिलीप गायकवाड, बाळासाहेब माने, उत्कला आढाव, सरोज गुरव, शशिकांत भागवत, ज्ञानेश्वर रोकडे, अविनाश साळुंखे यांनी संयोजन केले. (वार्ताहर)लक्षवेधी ग्रंथदिंडीलेझीम, झांजपथक व भजनी मंडळाच्या सहभागाने गावातून सवाद्य काढण्यात आलेली ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. पारंपरिक वेशभूषेत व कोल्हापुरी फेटे परिधान केलेले विद्यार्थी सर्वांचे आकर्षण ठरत होते.