शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत निवडणुकीच्या जेवणावळीवर बंदी-- येडेमच्छिंद्रचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 20:12 IST

शिरटे (जि. सांगली) : क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असणाºया येडेमच्छिंद्र येथील युवक व तंटामुक्त समितीने निवडणुकीच्या जेवणावळींवर बंदी

ठळक मुद्देजेवणावळ घातल्यास पन्नास हजाराचा दंड

निवास पवारशिरटे (जि. सांगली) : क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असणाºयायेडेमच्छिंद्र येथील युवक व तंटामुक्त समितीने निवडणुकीच्या जेवणावळींवरबंदी घातली आहे. निवडणूक लढविणाºया कोणत्याही उमेदवाराने गावात अथवाबाहेर कोठेही जेवणावळ घातली तर त्याला पन्नास हजार रुपये दंड करण्याचानिर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या रिंगणातील सर्वांनीचया निर्णयाचे स्वागत केले आहे.

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे सरपंच पदासाठी दुरंगी, तर सदस्यपदासाठीतिरंगी लढत होत आहे. सत्ताधारी जयंत क्रांती ग्रामविकास पॅनेल,जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनेल व क्रांतिसिंह नाना पाटील ग्रामसुधार युवकपॅनेलमध्ये तिरंगी लढत होत आहे.अर्ज माघारीनंतर निवडणुकीत रंग येऊ लागला आहे. जेवणावळी कशा होणार, कोठेहोणार, कोणता उमेदवार कोणत्या धाब्यावर जेवण देणार, अशी चर्चा सुरूअसतानाच, युवकांनी एकत्र येत जेवणावळीवर बंदी घालण्याबाबत तंटामुक्तसमितीशी चर्चा केली. युवकांच्या या निर्णयाचे स्वागत करीत तंटामुक्तसमितीनेही त्याला दुजोरा दिला.तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार,दि. ७ रोजी झालेल्या युवक, उमेदवार व पॅनेलप्रमुखांच्या बैठकीत निवडणूककाळात कोणत्याही उमेदवाराने गावात, शेतात अथवा बाहेर कोठेही मतदारांनाजेवण दिल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पन्नास हजार रुपयांचा दंडठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अ‍ॅड. संग्राम पाटील, शरद पाटील(नांगरे) व संजय पाटील यांनी पॅनेलप्रमुख या नात्याने झालेल्या ठरावावरसह्या केल्या.या निर्णयाचे वृत्त वाºयासारखे गावात पसरले. यामुळे चंगळवादी मतदारांचीगोची झाली, तर सूज्ञ मतदारांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत निवडणूक काळात जेवणावळीवर बंदी घालण्यात आलीआहे. जेवणावळीतूनच वादविवाद होत असतात. अनिष्ट घटना घडत असतात. हा निर्णयघेण्यामध्ये युवकांचा सिंहाचा वाटा आहे. तिन्ही पॅनेलचे प्रमुख, सर्वउमेदवार या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करतील, अशी खात्री आहे.- जयसिंग पाटील, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त समिती, येडेमच्छिंद्र