शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

वारणाली रुग्णालयाचे शनिवारी भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST

सांगली : वारणाली येथील महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या कामाला अखेर सहा वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. न्यायालयीन वाद संपल्यानंतर, आता येत्या ...

सांगली : वारणाली येथील महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या कामाला अखेर सहा वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. न्यायालयीन वाद संपल्यानंतर, आता येत्या शनिवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत १० आरोग्य केंद्रे आणि कूपवाडसाठी हॉस्पिटल मंजूर झाले होते. त्यातील १० आरोग्य केंद्रे सुरूही झाली आहेत. मात्र, जागेच्या वादात वारणालीत मंजूर झालेले ५० बेडचे हॉस्पिटल रखडले होते. महापालिकेच्या स्वत:च्या जागेवर हे हॉस्पिटल मंजूर असून, त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधीही शासनाने मंजूर केला आहे.

दोन वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर, कूपवाड गावठाणमध्येच हॉस्पिटल व्हावे, अशी महासभेत मागणी करण्यात आली. त्यानुसार, भाजपने वाघमोडेनगर येथे खासगी जागा विकत घेऊन तेथे हॉस्पिटल उभारणीचा ठराव महासभेत केला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विष्णू माने यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारणालीतच हॉस्पिटल होण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. आयुक्त नितीन कापडणीस यांनी वाघमोडेनगरमधील जागेचा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविला. शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने हॉस्पिटलच्या जागाबदलाचा ठराव नुकताच विखंडित केला. त्यातच जागेबाबत न्यायालयीन दावाही सुरू होता. हे दावे न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे रुग्णालय उभारणीची मार्ग मोकळा झाला असून, महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने भूमिपूजनाची तयारी सुरू केली आहे. येत्या शनिवारी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी सांगितले.

चौकट

निविदाही प्रसिद्ध

आयुक्त कापडणीस यांनी हॉस्पिटलचा आराखडा तयार करून, त्याच्या उभारणीची निविदा जाहीर केली होती. यामध्ये चार कोटी ४५ लाख ६१ हजार ५२३ रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. ऑनलाइन निविदा मागविल्या होत्या. या निविदा उघडून ठेकेदाराला वर्कऑर्डरही देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.