कडेगाव : चिंचणी (ता. कडेगाव) येथे विधिवत पूजन करून आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते लक्ष्मीदेवी मंदिराचे भूमिपूजन व पायाभरणी करण्यात आली.
चिंचणी येथील कै. सौ. लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल फाऊंडेशनच्यावतीने स्वखर्चाने लक्ष्मीदेवीच्या आकर्षक मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. मोहनराव कदम यांनी फाउंडेशनचे प्रमुख प्रल्हाद पाटील व राहुल पाटील यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. यावेळी युवा नेते डॉ. जितेश कदम, दिग्विजय कदम, सोनहिरा कारखान्याचे संचालक पी. सी. जाधव, निवृत्ती जगदाळे, अमोल पाटील, केन ॲग्रो कारखान्याचे संचालक भारत पाटील, उपसरपंच दीपक महाडिक, सोसायटीचे अध्यक्ष विश्वास महाडिक, माजी अध्यक्ष नंदकुमार माने, उत्तम निकम, माजी सरपंच अशोक महाडिक, अभिजित पाटील, कैलास माने, क्रांती कारखान्याचे माजी संचालक लालासोा महाडिक आदी उपस्थित होते.