इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथे कापूसखेड-इस्लामपूर बहे नाका ते जलशुद्धिकरण केंद्र बहे रस्तामधील काँक्रीट गटर व काँक्रीट रस्ते कामाचे भूमिपूजन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. या कामासाठी आमदार नाईक यांनी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.
यावेळी राजारामबापू बँकेचे संचालक संजय पाटील, सरपंच मंदाताई धुमाळे, उपसरपंच बाबासाहेब पाटील, राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक जयसिंग पाटील, माजी सरपंच प्रदीप पाटील, बाजार समितीचे सदस्य संपतराव पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य जयकर पाटील, राजेश पाटील, माजी सरपंच विठ्ठल माळी, जगन्नाथ स्वामी, राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच श्रीकांत पाटील, अध्यक्ष माणिक पाटील, पी. के. पाटील, प्रवीण पाटील, मोहित पाटील उपस्थित होते.
फोटो :
ओळ : कापूसखेड येथील विकासकामांचे भूमिपूजन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय पाटील, मंदाताई धुमाळे, बाबासाहेब पाटील, संपतराव पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते.