शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भोपाळच्या कंपनीचा सांगलीत १३ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:01 IST

सांगली : गुंतवणूक रकमेला घसघशीत व्याज व तसेच साडेपाच वर्षांत दामदुप्पटचे आमिष दाखवून भोपाळ येथील ‘निर्मल इंम्प्राहोम कार्पोरेशन लिमिटेड’ ...

सांगली : गुंतवणूक रकमेला घसघशीत व्याज व तसेच साडेपाच वर्षांत दामदुप्पटचे आमिष दाखवून भोपाळ येथील ‘निर्मल इंम्प्राहोम कार्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीने सांगली, मिरजेसह जिल्ह्यातही अनेकांना गंडा घातल्याचे रविवारी उघडकीस आले आहे. कंपनीत गुंतवणूक केलेल्या २५ जणांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची साडेतेरा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी कंपनीच्या प्रमुखासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कंपनीचा प्रमुख अभिषेक एस. चौहाण (रा. कालापिपाला), संचालक हरेश शर्मा, तुलसिंग चौधरी (त्रिकोडीया) निरंजन सक्सेना (भोपाळ), निर्मलादेवी चौहाण (कालापिपाल), लखन सोनी, (शहाजापूर, आंध्र प्रदेश) व व्यवस्थापक सुहास विजय गोकावे (सांगली) यांचा समावेश आहे. हे सर्वजण सध्या सीबीआयच्या कोठडीत अटकेत आहेत. संशयितांनी कोल्हापूर रस्त्यावरील एसटीच्या विभागीय कार्यालयाजवळ २०१२ मध्ये कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. गुंतवणूक रकमेला व्याज तसेच साडेपाच वर्षांत दुप्पट रक्कम दिली जाईल, असे आमिष दाखविले. लोकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडण्यासाठी त्यांनी सांगलीसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात एजंटांची नियुक्ती केली. त्यांना घसघशीत कमिशनचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून एजंटांनी लोकांना कंपनीत पैसे भरण्यास भाग पाडले.रविवारी २५ लोकांनी तक्रार केली. त्यांच्यावतीने उत्तम नामदेव बालटे (वय ३८, रा. विद्यानगर, आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे. बालटे हेही एजंट म्हणून काम करीत होते. त्यांनी स्वत:ही कंपनीत एक लाखाची रक्कम गुंतविली आहे. त्यांनी सांगली, जत, शिराळा, आटपाडी, मिरज व कर्नाटकातील अथणी येथील लोकांचे पैसे गोळा करून कंपनीत जमा केले आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, भुवनेश्वर, भोपाळ येथेही कंपनीचे कार्यालय सुरू होते. २०१५ मध्ये कंपनीने अचानक गाशा गुंडाळला. मध्यप्रदेशसह सर्वच ठिकाणी कंपनीच्या प्रमुखासह संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. सीबीआयने संशयितांना अटक केली. २० मे २०१५ रोजी सांगलीतील कार्यालयही बंद झाले. सीबीआयने कंपनीच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी तब्बल चार वर्षांनंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.गुंतवणूक पाच कोटींच्या घरातजिल्ह्यातील सुमारे एक हजार लोकांनी निर्मल कंपनीत सुमारे पाच कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्रथमच सांगली शहर पोलीस ठाण्यात २५ जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. फसवणुकीचा आकडा मोठा असल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसात कंपनीविरुद्ध तक्रारी दाखल होण्यास सुरुवात होणार आहे.