शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भीमराव माने यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

By admin | Updated: September 28, 2016 23:59 IST

कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्टीकरण : मराठा समाजाचे काम करण्याचा मानस

सांगली : कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील घटनेच्या निषेधार्थ आणि आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चे महाराष्ट्रात शांततेत निघत आहेत. या मागणीला शिवसेनेने पाठिंबा देण्याऐवजी त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील व्यंगचित्रातून मराठा समाजातील माता-भगिनींची बदनामी झाली आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेचा राजीनामा देत असल्याची माहिती कवठेपिरान (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, कोपर्डी येथील आमच्या भगिनीवर अत्याचार करून तिचा खून केला गेला. या घटनेमुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे. याचबरोबर शेतीला हमीभाव मिळत नाही. कधी नैसर्गिक संकटांमुळे, तर कधी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडत आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील मराठा समाजाला बसत आहे. यामुळे समाजातील तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी आहे. यासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाज शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रभर मोर्चे काढत आहे. याला शिवसेनेने पाठिंबा देण्याची गरज होती. कारण, शिवसेनेमध्ये सर्वाधिक मराठा समाज असून, तो एकनिष्ठ आहे. पाठिंबा देण्याऐवजी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील व्यंगचित्रातून मराठा समाजाच्या माता-भगिनींचा अवमान झाला आहे. याचा आपल्याला मानसिक त्रास झाल्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, अन्य कोणत्याही पक्षात न जाता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य प्रश्नांसाठी पूर्णवेळ लढा देणार आहे. उध्दव ठाकरे यांना शिवसेना व्यवस्थित रहावी, असे वाटत असेल तर, मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा द्यावा. भाजपचे सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणार नसेल, तर ठाकरे यांनी पाठिंबा काढून घ्यावा. (प्रतिनिधी)सेनेतील अन्य मराठा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेतमराठा समाजाची व्यंगचित्रातून बदनामी झाल्यानंतरही शिवसेना नेते माफी मागण्यास तयार नाहीत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या विविध पदांवर असणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहनही भीमराव माने यांनी केले.