शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमॅच्युअर खाे-खाे असाेसिएशनचे भीमराव माने अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

बोरगाव : सांगली येथील द अमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कवठेपिरान (ता. मिरज) येथील हिंदकेसरी स्पाेर्टसचे अध्यक्ष भीमराव बाळासाहेब माने ...

बोरगाव : सांगली येथील द अमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कवठेपिरान (ता. मिरज) येथील हिंदकेसरी स्पाेर्टसचे अध्यक्ष भीमराव बाळासाहेब माने यांची बिनविराेध निवड करण्यात आली.

असाेसिएशनची २०२० - २४ ची चौथी पंचवार्षिक वार्षिक निवडणूक बोरगाव (ता. वाळवा) येथे जय जवान क्रांतिवीर मंडळाच्या सभागृहात बिनविरोध पार पडली पडली. या निवडणूक प्रक्रियेत सांगली जिल्ह्यातील खो-खो शी संलग्न असणाऱ्या सर्व क्रीडा संस्थांच्या प्रतिनिधीनी सहभाग दर्शविला होता. या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुमार शिंदे यांनी काम पाहिले.

ही निवड एकूण १५ जागांसाठी होती. यात फक्त १५ अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करून अध्यक्षपदी भीमराव बाळासाहेब माने यांची निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी उत्तम कुलकर्णी (भडकंबे, ता वाळवा), विनोद जाधव (कार्वे ता. वाळवा). माणिकराव माने (नेर्ले, ता. वाळवा) यांची. कार्याध्यक्षपदी माणिकराव पाटील (बोरगाव, ता. वाळवा) यांची, सचिवपदी सम्राट शिंदे (मंगरूळ, ता. खानापूर) यांची, सहसचिवपदी मारुती शहापूरे (आष्टा) राहुल तामगावे ( कवठेपिरान) संतोष खांडेकर ( विटा) यांची, खजिनदारपदी विशाल भिंगारदिवे ( विटा) यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी रमण सुतार (विटा), प्रकाश पाटील ( बोरगाव), किरण मेटकरी ( विटा) सागर कुलकर्णी (भडकंबे) दीपक चव्हाण ( विटा) यांची निवड करण्यात आली.

द अमॅचुअर खो-खो असोसिएशन सांगली. ही सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र खो-खो असोसिएशन या संघटनेशी संलग्न असणारी एकमेव खो-खो संघटना आहे. या निवडी बिनविरोध पार पाडण्यासाठी द अमॅच्युअर खो-खो असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील, सांगली जिल्ह्यातील पहिले राष्ट्रीय खो-खो खेळाडू - पापा मुल्ला (विटा), मानसिंग शिंदे, सुधाकर माने ( विटा), युवराज जाधव, अमोल जाधव, मिलिंद चावरेकर, पांडुरंग गायकवाड, मिलिंद सावर्डे, युसूफ जमादार, महेश सुतार यांनी विशेष प्रयत्न केले.

सर्व राष्ट्रीय खेळाडू पंच यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले.

फाेटाे : ०७ बाेरगाव १