शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव माेटारीची जीपला धडक; पाच जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : औढी (ता. शिराळा) येथे जीप व आलिशान माेटारीची समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : औढी (ता. शिराळा) येथे जीप व आलिशान माेटारीची समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले. अपघातानंतर माेटारीचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. या माेटारीमध्ये जिलेटिनच्या तीन कांड्या सापडल्या. याप्रकरणी विनापरवाना स्फोटके ठेवल्याबद्दल व अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित माेटारीच्या अज्ञात चालकाविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात सोमवार, दि. ५ रोजी रात्री ८ वाजता घडला.

जीप (क्र. एमएच ०४ क्यू ५९१८) ही करमाळेहून शिराळाकडे, तर आलिशान माेटार (क्र. एमएच ०१ वायए २४४९) शिराळाकडून करमाळेकडे निघाली होती. भरधाव माेटारीने वेगाने येऊन जीपला धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, जीप रस्त्याच्या कडेला उलटली. जीपमधील फिर्यादी बबन बाळू पाटील, हणमंत मोहिते, राजाराम कदम, भानुदास माने, भगवान माने (सर्व रा. करमाळे, ता. शिराळा) हे पाच जण जखमी झाले. अपघातानंतर माेटारीचा चालक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच शिराळा पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त आलिशान माेटारीची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटिनच्या तीन कांड्या सापडल्या. याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल, तसेच विनापरवाना स्फोटके बाळगल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर व सहायक उपनिरीक्षक कुमार वायदंडे करीत आहेत.