शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भिलवडीत पेट्रोल पंप सील

By admin | Updated: July 14, 2017 00:25 IST

भिलवडीत पेट्रोल पंप सील

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव/भिलवडी : मापात पाप करणाऱ्या जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून छापे टाकण्याची मोहीम गुरुवारीही सुरूच होती. भिलवडी (ता. पलूस) येथे कृष्णा एजन्सीज व तासगाव येथील दत्तमाळावरील संतोष या दोन पंपांवर पथकाने छापा टाकला. भिलवडीतील पंप पाच दिवसांसाठी सील करण्यात आला आहे, तर तासगावला रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. त्यामुळे कारवाईचा तपशील मिळू शकला नाही.ठाण्यातील पथकाने तरुणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पेट्रोल पंपाच्या यंत्रात फेरफार करून ग्राहकांना इंधन कमी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभर या मायक्रोचिपच्या सुट्या भागाचा पुरवठा केला आहे. त्यांनी दिलेल्या नावांच्या आधारे राज्यभर छापासत्र सुरू आहे. भिलवडीत तासगाव रस्त्यालगत ए. एम. पाटील यांच्या मालकीचा कृष्णा एजन्सीज हा पंप आहे. गुरुवारी दुपारी ठाण्याच्या पथकाने अचानक छापा टाकला. सलग पाच तास पंपाच्या सर्व यंत्रणेची तपासणी केली. यामध्ये पल्सर की बोर्ड व मदर बोर्ड ही दोन यंत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत. ही दोन्ही यंत्रे पुढील तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आली. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. तोपर्यंत पंपावरील पेट्रोल विक्री बंद रहावी, यासाठी हा पंप सील करण्यात आला आहे. १७ जुलै रोजी तपासणीचा अहवाल मिळेल, त्यानंतर पुढील आदेश दिले जातील, असे पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी सांगितले. भिलवडीतील कारवाई पूर्ण झाल्यानंतर पथकाने तासगावमध्ये दत्तमाळावरील संतोष पेट्रोल पंपावर सायंकाळी सहा वाजता छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत पेट्रोल विक्रीच्या यंत्राची तपासणी सुरू होती. या कारवाईत अधिकारी व कर्मचारी असे २० जणांचे पथक सहभागी झाले होते. पथकाचे प्रमुख निरीक्षक चव्हाण म्हणाले की, कारवाईस रात्री खूप वेळ लागेल. यंत्रात आढळलेल्या दोषांबाबत संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच समजेल. आणखी पंप ‘रडार’वर : ठाण्याच्या पथकाने राज्यभर मापात पाप करणाऱ्या पंपांवर छापे टाकण्याची मोहीमच उघडली आहे. कोल्हापुरातील छापासत्र संपल्यानंतर पथकाने गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत बागणी (ता. वाळवा), अंकली (ता. मिरज) व गुरुवारी भिलवडी (ता. पलूस) व तासगाव येथे छापे टाकले. आणखी काही पंप ‘रडार’वर आहेत.