आष्टा : महाराष्ट्र शासनाचे ई पीक पाहणी ॲप सर्व शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत डाऊनलोड करून घ्यावे. याचा सर्व शेतकरी बांधवांना विविध शासकीय योजनांसाठी निश्चित फायदा होणार आहे, असे प्रतिपादन अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.
आष्टा येथील शिंदे मळ्यात ई पीक पाहणी ॲपबाबत शेतकऱ्यांना माहिती देताना देशपांडे बोलत होते. यावेळी आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक झुंजारराव शिंदे, महेश व्हावळ, तलाठी सागर सूर्यवंशी, सुभाष देसाई, प्रमोद शिंदे, नागेश देसाई, माणिक शिंदे, दीपक थोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
वैभव शिंदे म्हणाले, आष्टा शहर व परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने इ पीक पाहणी ॲप डाऊनलोड करावे.
तलाठी सागर सूर्यवंशी यांनी ॲप डाऊनलोड करून माहिती कशी भरावी याबाबत मार्गदर्शन केले यावेळी शुभम शिंदे, दीपक शिंदे, संकेत देसाई, हर्ष देसाई, सतीश देसाई, शरद शिंदे, मनोज शिंदे, सागर शिंदे ,सुजित शिंदे ,तुषार देसाई ,सुमित शिंदे, सागर जगताप ,कुमार शिंदे ,प्रमोद शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते
फोटो : ११ आष्टा २
ओळ : आष्टा येथे ई पीक पाहणी ॲपबाबत अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वैभव शिंदे, झुंजारराव शिंदे, सुभाष देसाई, नागेश देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित हेाते.