शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

‘ई-ट्रेडिंग’चा शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:06 IST

सांगली : विदर्भातही बाजार समित्या कार्यरत असल्या तरी, त्यांची उलाढाल सांगली बाजार समितीएवढी नाही. शेतकºयांच्या विश्वासामुळेच येथील व्यवहार वाढत आहेत. त्यात शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ई-ट्रेडिंग व ई-पेमेंट प्रणालीमुळे कृषी क्षेत्रातील व्यवहारात पारदर्शकता आली आहे. ही प्रणाली प्रभावीपणे कार्यरत असल्याने शेतकºयांना याचा फायदा होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ...

सांगली : विदर्भातही बाजार समित्या कार्यरत असल्या तरी, त्यांची उलाढाल सांगली बाजार समितीएवढी नाही. शेतकºयांच्या विश्वासामुळेच येथील व्यवहार वाढत आहेत. त्यात शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ई-ट्रेडिंग व ई-पेमेंट प्रणालीमुळे कृषी क्षेत्रातील व्यवहारात पारदर्शकता आली आहे. ही प्रणाली प्रभावीपणे कार्यरत असल्याने शेतकºयांना याचा फायदा होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी येथे केले.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सहकार भवनमध्ये आयोजित सत्कार समारंभात अहिर बोलत होते. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. मोहनराव कदम, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.अहिर पुढे म्हणाले की, काळाच्या बरोबर बदलण्यासाठी व शेतकºयांचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. शासनाच्या ई-ट्रेडिंग, ई-पेमेंट यासारख्या पारदर्शी योजना राबविल्या जात आहेत. यामुळे थेट लाभ शेतकºयांना होत आहे.सांगली बाजार समितीच्या उलाढालीबद्दल आश्चर्य व्यक्त करत ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीचा वार्षिक नफा १८ कोटींचा व ठेवी ४५ कोटींच्या आहेत. ही गोष्ट कृषी क्षेत्रासाठी आश्वासक आहे. विदर्भात बाजार समित्यांचे जाळे असताना एकही बाजार समिती सांगलीएवढी सक्षम नाही.खा. संजयकाका पाटील म्हणाले की, सांगली बाजार समिती हळद, बेदाणा व गुळासाठी देशभर प्रसिध्द आहे. हा लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बाजार समितीत सचिव प्रकाश पाटील यांचे योगदान आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्या अनुभवाचा फायदा बाजार समितीला होईल.राज्यमंत्री अहिर यांच्याहस्ते सचिव प्रकाश पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विक्रम सावंत, दीपक शिंदे-म्हैसाळकर, तानाजी पाटील, जीवन पाटील, दादासाहेब कोळेकर, सुभाष खोत, दीपक शिंदे, कुमार पाटील, बाळासाहेब बंडगर, वसंतराव गायकवाड, एन. एम. हुल्याळकर आदी उपस्थित होते.शेती व्यवसाय आता प्रतिष्ठेचाअहिर म्हणाले की, पूर्वी शेती हा कमीपणाचा व्यवसाय समजला जात असे. आता मात्र, आपल्या शेतीमालाला जगभरातून मागणी आहे. तांदूळ, गहू उत्पादनात देश समृध्द झाला आहे. त्याच पध्दतीने देश तूर उत्पादनातही आघाडीवर आहे. येत्या काही दिवसात देशातील शेतीमालाला अधिक महत्त्व येणार असल्याने शेतीला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे.