सचिन जाधव हे २०१० मध्ये भरती झाले होते. सध्या ते आंध्र प्रदेशातील चित्तुर येथे आयटीबीपी ५३ बटालियनकडे कार्यरत होते. सहा वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले हाेते. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. महिन्याभरापूर्वी त्यांना कन्यारत्न झाले. या कन्येच्या नामकरण विधीसाठी ते आपले कर्तव्य बजावून आंध्र प्रदेशमधून गावी येण्यासाठी निघाले असताना त्यांचे अपघाती निधन झाले. आपल्या कन्येचा नामकरण कार्यक्रम जोरदार करायचा, असे त्यांनी ठरविले होते. छोट्या छकुलीला पाहण्याअगोदरच त्यांचे झालेले अपघाती निधन गावकऱ्यांना चटका लावून गेले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
सोमवारी सायंकाळी सहा वाजता बेंद्री येथे फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
फाेटाे : ११ तासगाव १