शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व औषध प्रशासनातर्फे डाॅ. महेश जाधव याच्यावर स्वतंत्र कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST

मिरजेतील अपेक्स रुग्णालयात ८७ कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव, त्याचा भाऊ न्यूरो सर्जन डॉ. मदन जाधव ...

मिरजेतील अपेक्स रुग्णालयात ८७ कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव, त्याचा भाऊ न्यूरो सर्जन डॉ. मदन जाधव यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी डाॅ. जाधव बंधूंसह रुग्णालयातील कर्मचारी व तीन रुग्णवाहिका चालकासह १३ जणांना अटक केली आहे. डाॅ. जाधव याने महागडी वाहने व मिरजेत मालमत्ता खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले असल्याने पोलिसांनी डाॅ. जाधव याच्या आर्थिक व्यवहारांची चाैकशी सुरु केली आहे.

मिरजेतील अपेक्स रुग्णालय प्रकरणात आणखी काही डाॅक्टरांवर अटकेची टांगती तलवार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिरजेत दुचाकी शोरुम भाड्याने घेऊन कोविड रुग्णालय चालविणाऱ्या डाॅ. महेश जाधव यास काही डाॅक्टरांनी मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी संबंधित डाॅक्टरांना चाैकशीसाठी पाचारण केले आहे. चाैकशीस हजर राहण्याची नोटीस बजावल्यानंतर सांगलीतील एका छातीरोग तज्ज्ञाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. जामीन अर्जावर सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार असून पोलिसांनी जामीन अर्जास विरोध केला आहे. डाॅ. जाधव यास मदत करणाऱ्या आणखी काही जणांवर पोलिसांच्या कारवाईची टांगती तलवार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अ‍पेक्स कोविड रुग्णालयावर एक आठवड्यापूर्वी अन्न व औषध विभागाच्या पथकाने छापा टाकून साडेचार लाखांचा औषधसाठा जप्त केला आहे. रुग्णालयास औषध विक्रीचा परवाना नसतानाही डाॅ. जाधव याने खासगी दुकानाच्या नावावर औषध विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने डाॅ. महेश जाधव याच्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासनातर्फे स्वतंत्र खटला दाखल करण्याची तयारी सुरु आहे.